Stocks to Buy Sakal
अर्थविश्व

युक्रेन-रशिया युद्धामुळे शेअर बाजारावर ताण; आज कोणते शेअर्स दाखवतील दम?

Share Market Updates: रशिया-युक्रेन संकटामुळे बाजारावरील दबाव शुक्रवारीही कायम राहिला आणि सलग तिसऱ्या दिवशी निफ्टी आणि सेन्सेक्स मोठ्या घसरणीसह बंद झाले.

शिल्पा गुजर

Share Market Updates: रशिया-युक्रेन संकटामुळे बाजारावरील दबाव शुक्रवारीही कायम राहिला आणि सलग तिसऱ्या दिवशी निफ्टी आणि सेन्सेक्स मोठ्या घसरणीसह बंद झाले. मागील आठवड्यात शेअर बाजारात सुमारे 2.5% ची घसरण झाली. शुक्रवारच्या व्यवहारात बीएसईच्या (BSE) सर्व सेक्टर इंडेक्समध्ये विक्री दिसून आली. दिग्गजांसह मिडकॅप, स्मॉलकॅप इंडेक्समध्येही दबाव दिसून आला. ऑटो, रियल्टी, मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.

शुक्रवारी व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स (Sensex) 768.87 अंकांनी म्हणजेच 1.40 टक्क्यांच्या घसरणीसह 54,333.81 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 252.70 (Nifty) अंकांनी म्हणजेच 1.53 टक्क्यांनी घसरून 16245.35 वर बंद झाला.

युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियन हल्ल्याच्या अहवालामुळे शुक्रवारी जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि सप्लाय चेनमधील गंभीर समस्यांमुळे महागाईचा दर आरबीआयने निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त होण्याची भीती वाढली आहे. ही गोष्टी तात्पुरती असली, तरी चिंताजनक आहे.

आज बाजाराची वाटचाल कशी होईल ?

निफ्टी डेली टाईम फ्रेमवर काही दिवसांच्या कंसोलिडेशननंतर खाली घसरल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. आता शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी 16,000 पर्यंत खाली जाण्याची शक्यता वाढली आहे. निफ्टीला 16100-16000 च्या रेंजमध्ये सपोर्ट दिसत आहे आणि 16,500 स्तरावर रेझिस्टन्स दिसतो.

टेक्निकल निफ्टीने डेली टाईम फ्रेमवर बियरीश कँडल तयार केली आहे जी या काउंटरमधील कमकुवतपणाचे लक्षण असल्याचे चॉईस ब्रोकिंगचे पलक कोठारी म्हणाले. या व्यतिरिक्त, गेल्या 5 आठवड्यांपासून निफ्टी कमी लोअर लोज आणि लोअर हाय फॉर्मेशनसह व्यवहार करत आहे जे येत्या काही दिवसात कमजोरीचे लक्षण आहे.

आज कोणते शेअर्स तुम्हाला करतील मालामाल ?

डॉक्टर रेड्डी (DRREDDY)

आयटीसी (ITC)

टेक महिंद्रा (TECHM)

बीपीसीएल (BPCL)

अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

झी एंटरटेंमेंट लिमिटेड (ZEEL)

टीव्हीएस मोटर्स (TVSMOTORS)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

एसआरएफ लिमिटेड (SRF)

मॅक्स फायनांशियल सर्व्हिसेस (MFSL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Live Update : दादर प्लाझाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू,चार जखमी

ICC Women’s World Cup 2025 Points Table: भारताच्या पोरींनी शेजाऱ्यांना त्यांची जागा दाखवली, पाकिस्तानची गुणतालिकेत गोची केली

PMC News : बांधकाम परवानगीचे अधिकार द्या; समाविष्ट गावांबाबत पुणे महापालिकेचे राज्य सरकारला पत्र

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

SCROLL FOR NEXT