tesla main.jpg 
अर्थविश्व

Tesla ला अमेरिकेत झटका, भारतात स्वागत; सांगितलं दीड लाख गाड्या परत घ्या

सकाळ ऑनलाइन टीम

नवी दिल्ली- एलॉन मस्क यांनी भारतात बेंगळुरु येथे टेस्लाचा (Tesla) प्रकल्प उभारणार असल्याचे जाहीर करताच देशभरातून याचे स्वागत करण्यात आले आहे. इकडे भारतात टेस्लाचे स्वागत केले जात असताना दुसरीकडे कंपनीला अमेरिकेत मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेतील नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी एडमिनिस्ट्रेशनने (NHTSA) बुधवारी टेस्ला इंकला 1,58,000 कार परत घेण्यास सांगितले आहे. या यादीत टेस्लाचे एस आणि एक्स मॉडेलचा समावेश आहे. दरम्यान, या गाड्यांमधील टचस्क्रीन डिस्प्ले काम करत नसल्यामुळे सुरक्षिततेला धोका वाढत आहे. 

एका ऑटो सुरक्षा एजन्सीने नोव्हेंबरमध्ये सुरक्षा तपासणी केल्यानंतर टेस्लाला 2012 ते 2018 या काळात बाजारात आलेली एस आणि 2016 ते 2018 या काळात तयार झालेल्या एक्स मॉडेलच्या गाड्या तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याची विनंती केली होती. कारण या गाड्यांमध्ये मोटार वाहन सुरक्षा नियमावलीसंबंधी अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. 

टेस्लाने याविनंतीवर अद्याप काहीच उत्तर दिलेले नाही. परंतु, कंपनीला 27 जानेवारीपर्यंत उत्तर द्यायचे आहे. जर टेस्ला गाड्या परत बोलावण्यास सहमत झाले तर त्यांना एनएटीएसएला कळवावे लागेल. टचस्क्रीनमधील त्रुटीमुळे सुरक्षेसंबंधित प्रश्न निर्माण होत आहेत. यामध्ये रिअर व्ह्यू/बॅकअप कॅमेरा इमेजचे नुकसान होत आहे. 

एनएचटीएसएने म्हटले की, टेस्ला आपल्या वाहनांमधील काही समस्येवर काम करण्यास प्रयत्न करत आहेत. काही अपडेटही करण्यात आले आहे. परंतु, हे अपडेट पुरेसे नसल्याचे एनएचटीएसएने म्हटले आहे. कंपनीला यावर काम करावे लागेल. त्यासाठी गाड्या रिकॉल करणे आवश्यक आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT