chinese-companies 
अर्थविश्व

अमेरिकेचा मोठा निर्णय : ८०० चीनी कंपन्या अमेरिकन शेअर बाजाराबाहेर

वृत्तसंस्था

अमेरिकेच्या शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या ८०० चीनी कंपन्यांची नोंदणी रद्द करून त्यांना अमेरिकेच्या शेअर बाजाराबाहेर काढण्यासंदर्भातील निर्णय अमेरिकेच्या सिनेटने घेतला आहे. अमेरिकन सिनेटने एकमताने चीनी कंपन्यांची अमेरिकन शेअर बाजारातील नोंदणी रद्द करण्यासाठीचे विधेयक (बिल) मंजूर केले आहे. या निर्णयाचा मोठा दणका चीनी कंपन्यांना बसणार आहे. 

अमेरिकेच्या शेअर बाजारात नोंदणी झालेल्या चीनी कंपन्यांमध्ये अमेरिकेतील मोठी गुंतवणूक होत असते. यामुळे अमेरिकेचा पैसा चीनी कंपन्यात गुंतवला जाऊन त्याचा लाभ चीनला होत असल्याची अमेरिकेची भूमिका आहे. ही गुंतवणूक अमेरिकेच्या मालकीच्या कंपन्यांमध्येच झाली पाहिजे अशी भूमिका अमेरिकेची आहे.

* होल्डिंग फॉरेन कंपनीज अकाऊंटेबल अॅक्ट बिल
* अमेरिकेतील गुंतवणूकदारांचे हित राखण्यासाठी हे पाऊल 
*  सर्वच पक्षाच्या सिनेटर्सचा या विधेयकासाठी पाठिंबा
* अलीबाबासहित आघाडीच्या चीनी कंपन्यांना बसणार दणका


या विधेयकानुसार अमेरिकन शेअर बाजारात नोंदणी झालेल्या कंपन्यांना महत्त्वाची माहिती अमेरिकेच्या सिनेटला द्यावी लागणार आहे. यातील पहिली अट म्हणजे अमेरिकेच्या शेअर बाजारात नोंदणी झालेल्या कंपन्यांना त्यांची मालकी किंवा नियंत्रण परकी सरकारकडे आहे का?  याची माहिती द्यावी लागणार आहे.

दुसरी आणि अधिक महत्त्वाची अट म्हणजे अमेरिकन शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांना पब्लिक कंपनी अकाऊंटिंग ओव्हरसाईट बोर्डाच्या ऑडिटला सलग तीन वर्षे सामोरे जात त्यातील निकषांची पूर्तता करावी लागणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

'चीनी कंपन्यांना इतर कंपन्यांप्रमाणेच नियम लागू केले जावेत ही आमची भूमिका आहे. पारदर्शकतेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे', असे मत सिनेटर क्रिस वॅन हॉलेन यांनी व्यक्त केले आहे. हे विधेयक पास करण्यात हॉलेन यांनी पुढाकार घेतला होता. होल्डिंग फॉरेन कंपनीज अकाऊंटेबल अॅक्ट असे या विधेयकाचे नाव आहे. सर्वच पक्षाच्या सिनेटरने या विधेयकासाठी पाठिंबा दिला आहे. चीनी कंपन्यांमध्ये असलेल्या पारदर्शकतेच्या अभावामुळे अमेरिकेत गुंतवणूकदार मोठ्या जोखमीला सामोरे जातात, अमेरिकेतील गुंतवणूकदारांचे हित राखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे पुढे हॉलेन यांनी म्हटले आहे.

सध्या चीनमध्ये आणि हॉंगकॉंगमध्ये नोंदणी झालेल्या कंपन्यांवर पब्लिक कंपनी अकाऊंटिंग ओव्हरसाईट बोर्डाच्या ऑडिटचे बंधन नाही. अमेरिक-चीन इकॉनॉमिक अॅंड सिक्युरिटी रिव्ह्यू कमिशनने अमेरिकेतील शेअर बाजारात नोंदणी झालेल्या कंपन्यांची यादी बनवली आहे. यामध्ये चीनमधील आघाडीच्या कंपन्या, अलीबाबा, बाईडू आणि जेडी डॉट कॉमचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT