Chemical Stock sakal
अर्थविश्व

Chemical Stock: या केमिकल कंपनीचा 4000% पेक्षा जास्त परतावा, आता स्टॉक स्प्लिटचा निर्णय...

विष्णू केमिकल्स (Vishnu Chemicals) या स्पेशॅलिटी केमिकल्सच्या स्मॉल कॅप कंपनीने अवघ्या दोन ते तीन वर्षांत गुंतवणूकदारांना सुमारे एक हजार टक्के परतावा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

विष्णू केमिकल्स  (Vishnu Chemicals) या स्पेशॅलिटी केमिकल्सच्या स्मॉल कॅप कंपनीने अवघ्या दोन ते तीन वर्षांत गुंतवणूकदारांना सुमारे एक हजार टक्के परतावा दिला आहे. दहा वर्षांत हा शेअर सुमारे 4,000 टक्क्यांनी वाढला आहे.

आता या कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा अर्थात स्प्लिटचा निर्णय घेतला आहे म्हणजेच गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमधील शेअर्सची संख्या वाढेल पण फेस व्हॅल्यू कमी होईल. कंपनीने 31 ऑक्टोबरला स्टॉक एक्स्चेंजला याबद्दल माहिती दिली होती.

नियामक फायलिंगनुसार, विष्णू केमिकल्सचे शेअर्स 5:1 च्या प्रमाणात विभाजित केले जातील.10 रुपयांची फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरला 2 रुपयांच्या 5 शेअर्समध्ये विभागले जाईल. भागधारकांची मंजुरी मिळाल्यानंतर तीन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

22 डिसेंबर 2021 रोजी त्याचे शेअर्स 771.60 रुपयांवर होते, जे एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे. यानंतर खरेदी वाढली आणि या वर्षी 8 सप्टेंबरपर्यंत 178 टक्क्यांच्या तेजीसह हा शेअर 2,147 रुपयांवर पोहोचला. पण सध्या त्याचे शेअर्स सध्या 22 टक्क्यांच्या डिस्काउंटवर आहेत.

विष्णू केमिकल्स ही स्पेशॅलिटी केमिकल्स तयार करते. स्टील, काच, फार्मा, पिगमेंट्स आणि डाईजच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना हे केमिकल्स पुरवठा करते.  कंपनीचा निव्वळ नफा जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये तिमाही आधारावर 29.31 कोटी रुपयांवरून 32.56 कोटी रुपयांवर गेला आहे. त्याच वेळी, महसूल देखील याच कालावधीत 303.91 कोटी रुपयांवरून 321.52 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT