मुंबई : टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सची भागीदारी असलेल्या विस्तारा एअरलाईन्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विस्तारातर्फे मुंबईतून कोलंबोसाठी २५ नोव्हेंबरपासून दररोज (बुधवार वगळता) थेट सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे भारत आणि श्रीलंकादरम्यान प्रथमच प्रीमियम इकॉनॉमी क्लासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कंपनीतर्फे सुरवातीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कमी खर्चात परतीचे तिकीट मिळणार आहे. मुंबईतून निघालेल्या पहिल्या विमानातून कोलंबो येथे गेलेल्या सर्व प्रवाशांचे विस्तारातर्फे विमानतळावर पुष्पहार घालून व मिठाईचे वाटप करून स्वागत करण्यात आले.
या वेळी श्रीलंकेतील प्रसिद्ध नृत्यही तेथील कलाकारांनी सादर केले. विस्ताराच्या या सेवेमुळे श्रीलंकेतील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केला.
मुंबई-कोलंबो सेवेची वैशिष्ट्ये
web title : vistara Airlines direct flights from Mumbai to Colombo
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.