विशेष : शेअर बाजार आणि करिअर sakal
अर्थविश्व

शेअर बाजारात आज कशी असेल स्थिती ? हे ठरू शकतात टॉप 10 शेअर्स

सोमवारी शेअर बाजारात घसरण परंतु आज कशी स्थिती असेल आणि कोणते शेअर्स टॉप 10 ठरू शकतात हे आपण पाहणार आहोत.

शिल्पा गुजर

Top 10 Stocks to buy today: खराब जागतिक संकेतांनी बाजारावर (Share Market) परिणाम केला. सोमवारी निफ्टी (Nifty) 532 आणि सेन्सेक्स (Sensex) 1700 अंकांनी घसरला. बँकिंग, रियल्टी, ऑटो आणि मेटल शेअर्समध्ये (shares) जोरदार विक्री दिसून आली. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी ट्विन्स आणि कोटक महिंद्रा बँक यांनी दबाव निर्माण केला आहे.

रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढला आहे. 16 फेब्रुवारीला रशिया युक्रेनवर हल्ला करू शकतो, असा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी केला आहे. रशियाने युक्रेनभोवती एक लाख ३० हजार सैनिक तयार केले आहेत. याचाच परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून येत आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला. निफ्टीमध्ये 10 महिन्यांपासून इंट्रा-डेमध्ये मोठी घसरण झाली आहे. 12 एप्रिल 2021 नंतर निफ्टीमध्ये इंट्रा-डे सर्वात मोठी घसरण झाली आहे. या वर्षी पहिल्यांदाच निफ्टी 500 हून अधिक अंकांनी घसरला आहे. बीएसईच्या सर्व सेक्टर इंडेक्समध्ये घसरण झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्री झाली आहे.

युक्रेनच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि रशिया यांच्यातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. यूएस फेडच्या आपत्कालीन बैठकीमुळे अमेरिकेत लवकरच आर्थिक धोरणे कडक होण्याची भीती वाढली आहे, त्यामुळे बाजारावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. देशांतर्गत बाजाराबद्दल बोलायचे तर घाऊक महागाईचा दर डिसेंबरमध्ये 13.56 टक्क्यांवरून 12.96 टक्क्यांवर आला आहे. पण, इंधन आणि उर्जेचे दर कमी होऊनही ते उच्च दरावर राहिले आहे.

आजच्या दिवसाचे टॉप 10 शेअर्स ? (Top 10 Shares to buy)

जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

एचडीएफसी लाइफ (HDFCLIFE)

टाटा स्टील (TATASTEEL)

टाटा मोटर्स (TATAMOTORS)

एचडीएफसी (HDFC)

एलआयसी हाउसिंग फायनान्स (LICHSGFIN)

फेडरल बँक (FEDERALBNK)

अशोक लेलँड (ASHOKLEY)

श्रीराम ट्रांसपोर्ट फायनांस कंपनी लिमिटेड (SRTRANSFIN)

आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT