Share Market
Share Market Sakal
अर्थविश्व

आज सोमवारी कसा असेल शेअर मार्केटचा मूड? कोणत्या शेअर्सवर ठेवाल नजर?

सकाळ डिजिटल टीम

देशांतर्गत शेअर बाजारासाठी मागचा आठवडा चांगला राहिला. देशांतर्गत शेअर बाजाराने जागतिक बाजारापेक्षा चांगली कामगिरी केली आहे.

शिल्पा गुजर

देशांतर्गत शेअर बाजारासाठी मागचा आठवडा चांगला राहिला. देशांतर्गत शेअर बाजाराने जागतिक बाजारापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. महागाई आणि जागतिक ऊर्जा संकटाची चिंता असूनही, शुक्रवारी बाजार नफ्यासह बंद झाला. आयटी आणि ऑटो सेक्टरमध्ये मजबूत तेजी दिसली. सेन्सेक्स शुक्रवारी 60 हजाराच्या वर बंद झाला, निफ्टी देखील 17900 च्या जवळ बंद झाला. निफ्टीसाठी पुढील रेझिस्टंस लेव्हल 17950 वर दिसते आहे. बाजाराने ही लेव्हल मोडली तर 18000 ची पातळी सहज पार करेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या काळात बाजारात थोडी घसरण झाली तर खरेदीची चांगली संधी उपलब्ध होईल असा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत.

तांत्रिकदृष्ट्या निफ्टी सध्या 17950 ते 17800 च्या रेझिस्टंस लेव्हलवर व्यापार करत आहे. विक्रीचा दबाव इथून तयार केला जाऊ शकतो. पण जर निफ्टी या झोनच्या पलीकडे व्यापार करू शकला तर ते पुढे 18200/18300 च्या दिशेने जाऊ शकतात असे स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे (Swastika Investmart) रिसर्च हेड संतोष मीना म्हणाले. दुसऱ्या बाजुचा विचार केला तर खाली निफ्टीला सुमारे 17650 वर सपोर्ट आहे. जर ही पातळी तुटली तर निफ्टी 17450 च्या पातळीपर्यंत खाली येऊ शकते.

बँक निफ्टी क्रिटिकल रेझिस्टंस झोन 3800-38300 च्या आसपास आहे. शॉर्ट कव्हरिंगमुळे ते 39000 वर येऊ शकते. त्याच वेळी, त्याला खाली 37500 वर सपोर्ट आहे. जर ही पातळी मोडली तर बँक निफ्टी 36500/36000 पर्यंत खाली येऊ शकते.

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

इंडियन एनर्जी एक्सचेंज (IEX)

डिक्सन टेक्नोलॉजीज इंडिया लिमिटेड (Dixon Technologies)

मद्रास रबर फॅक्ट्री (MRF)

मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लि. (MCX)

इंडियामार्ट (IndiaMART)

पर्सिस्टंस सिस्टम्स (Persistent Systems)

बंधन बँक (Bandhan Bank)

बँक ऑफ़ बडोदा (Bank of Baroda)

माइंडट्री (Mindtree)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT