note currency sakal
अर्थविश्व

नोटा छापण्याचा अधिकार कोणाला? वाचा सविस्तर

सध्या देशात नोटांवरून राजकारण तापलं असताना आपण नोटांबद्दलच्या काही कायदेशीर बाबी जाणून घेऊयात.

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाच्या (आप) अनेक नेत्यांनी बुधवारी सरकारला देशात ‘समृद्धी’ आणण्यासाठी चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो लावण्यास सांगितले. याबाबत त्यांनी नरेंद्र मोदींना विनंती केली आहे.

बँक नोटा आणि नाण्यांच्या डिझाइन आणि स्वरूपातील बदल भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि केंद्र सरकारद्वारे ठरवले जातात. चलनी नोटांच्या रचनेत कोणताही बदल करण्यासाठी RBI च्या केंद्रीय मंडळ आणि केंद्र सरकारची मान्यता घ्यावी लागते. नाण्यांच्या रचनेत बदल करणे हा केंद्र सरकारचा विशेषाधिकार आहे.

 नोटा छापण्यात RBI काय भूमिका बजावते?

RBI चलनाची डिजाईन तयार करते नंतर ती डिजाईन आरबीआयच्या केंद्रीय मंडळासमोर ठेवली जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 चे कलम 22, RBI ला भारतात बँक नोट छापण्याचा अधिकार देते. कलम 25 नुसार, ‘बँकेच्या नोटांचे डिजाईन, रचना आणि साहित्य आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाने केलेल्या शिफारशी नंतर केंद्र सरकार मंजूर करते.

आरबीआयच्या वेबसाइटनुसार, चलन व्यवस्थापन विभाग, बँक नोट्स डिजाईन करणे, नोटा आणि नाण्यांच्या मागणीचा अंदाज ठरवणे, देशभरात नोटा आणि नाण्यांचे सुरळीत वितरण सुनिश्चित करणे आणि चलनातून अयोग्य नोटा आणि चलनात नसलेली नाणी परत मिळवणे, बँक नोटांची संख्या निश्चित करणे, चलनी नोटेची रचना बदलायची असल्यास चलन विभाग डिझाईनवर काम करतो आणि त्याचा अहवाल आरबीआयकडे सादर करतो,  त्यानंतर केंद्र सरकारला त्याची शिफारस केली जाते. नंतर केंद्र सरकार अंतिम मान्यता देते.  सध्या RBI च्या चलन व्यवस्थापन विभागाचे डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर आहेत.

नाणी कायदा (2011) केंद्र सरकारला विविध मूल्यांमधील नाणी डिजाईन करण्याचा अधिकार देतो. नाण्यांच्या बाबतीत, आरबीआयची भूमिका केंद्र सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या नाण्यांच्या वितरणापुरती मर्यादित आहे. मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडा येथील भारत सरकारच्या मालकीच्या चार छापखान्यांमध्ये नाणी काढली जातात.

क्लीन नोट धोरणानुसार, RBI जनतेला चांगल्या दर्जाच्या नोटा पुरवते. चलनातून परत मिळालेल्या नोटांची तपासणी केली जाते, त्यानंतर चलनास योग्य त्या पुन्हा जारी केल्या जातात, तर खराब आणि फाटलेल्या नोटा नष्ट केल्या जातात.

सध्या 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये आणि 2,000 रुपयांच्या नोटा सध्या जारी केल्या जात आहेत. 2 आणि 5 रुपयांच्या नोटा आता चलनात येणार नाहीत. या मूल्यांच्या जुन्या नोटा, जर अजूनही चलनात असतील तर त्या कायदेशीर असतील. 1 रुपयाच्या नोटा चलनात असतील तर त्या देखील कायदेशीर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT