Share Market pre analysis esakal
अर्थविश्व

Share Market:100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर 20% वाढण्याचा अंदाज

52 आठवड्यांच्या उच्चांकावरून जवळपास 21 टक्के डिस्‍काउंटवर ट्रे़ड करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारांत सुरू असलेल्या अस्थिरतेत तुम्हाला दर्जेदार स्टॉकचा पोर्टफोलिओमध्ये समावेश करायचा असेल, तर पीएसयू शेअर गेल इंडियाचा (Gail India) विचार करु शकता. ब्रोकरेज रिसर्च फर्म आयसीआयसीआय डायरेक्टने या स्टॉकवर बाय रेटींग दिले आहे. हा शेअर त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून जवळपास 21 टक्के डिस्‍काउंटवर ट्रे़ड करत आहे.

या वर्षी जुलैमध्ये कंपनीने त्याच्या भागधारकांना बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली होती. त्याची एक्‍स-बोनस डेट 6 सप्टेंबर आणि रेकॉर्ड तारीख 7 सप्टेंबर 2022 होती. कंपनीने विद्यमान 2 शेअर्सच्या बदल्यात 1 बोनस शेअर दिला आहे. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की गॅस ट्रान्समिशन व्हॉल्यूम वाढणे अपेक्षित आहे. आउटलुक चांगला दिसत आहे. 8 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 92.55 रुपये होती. (worth of this share is less than 100 rs likely to grow by 20 percent)

20% वाढीची शक्यता
ब्रोकरेज रिसर्च फर्म आयसीआयसीआय डायरेक्टने गेल इंडियाच्या स्टॉकवर आपले बाय रेटींग कायम ठेवले आहे. तसेच 12 महिन्यांच्या दृष्टीकोनातून 110 रुपयांचे टारगेट ठेवले आहे. 8 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 92.55 रुपयांवर बंद झाली होती. अशाप्रकारे, स्टॉक सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 20 टक्क्यांनी वाढू शकतो.

2022 मध्ये आतापर्यंत स्टॉकमध्ये सुमारे 5 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 1 वर्षात स्टॉकमध्ये 4 टक्के निगेटिव्ह रिटर्न दिसला आहे. 19 एप्रिल 2022 रोजी, स्टॉकने बीएसईवर 115.69 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. अशा प्रकारे, सध्या हा स्टॉक त्याच्या उच्चांकावरून सुमारे 21 टक्के सवलतीत मिळत आहे.

गॅस ट्रान्समिशन व्हॉल्यूममध्ये वाढ झाल्याचे ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे. एलएनजीच्या किमती वाजवी आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात गॅस ट्रेडिंगमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. शेअरने सातत्याने गुंतवणूकदारांना डिव्हिडेंड दिला आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या अखेरीस, GAIL च्या नैसर्गिक वायू पाइपलाइनचे नेटवर्क 14,500 किमी झाले आहे. गेल इंडिया ही गॅस ट्रान्समिशन आणि ट्रेडिंग, एलपीजी, एलएलएच आणि पेट्रोकेमिकल्ससारख्या विविध बिझनेस सेगमेंटसह गॅस युटिलिटी कंपनी आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT