Share Sakal
अर्थविश्व

Indian Oil, Exide Industries आणि Paisa Lo चे शेअर्स करतील मालामाल

या तीन स्टॉक्सचा नक्की विचार करा, असे शेअर बाजार तज्ज्ञ सांगत आहेत.

शिल्पा गुजर

या तीन स्टॉक्सचा नक्की विचार करा, असे शेअर बाजार तज्ज्ञ सांगत आहेत.

Stocks to Invest : आज आणखी काही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर या तीन स्टॉक्सचा नक्की विचार करा असे शेअर बाजार तज्ज्ञ सांगत आहेत.

पैसा लो डिजिटल (Paisalo Digital):

पैसा लो डिजिटलने (PaisaLo Digital) महिला उद्योजक, लघु व्यवसाय, कृषी, संबंधित कृषी आणि एमएसएमई विभागांना पाठिंबा देण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेसोबत कर्ज करार (Lending Aggriment) केला आहे. पीएनबी (PNB) आणि पैसा लो (Paisa Lo) एकत्रितपणे पीएनबीची कमी दरातील कर्ज गरजूंपर्यंत पोहोचवण्यात मदत करतील. सोर्सिंग, सर्व्हिसिंग आणि स्मॉल तिकीट इन्कम जनरेशन प्रायव्हेट सेक्टरमधील लोनला छोट्या व्यवसायांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पाऊल उचलले जाणार आहे. पैसा लो 10 हजार ते 1 लाखापर्यंतचे इनसिक्युअर्ड लोन प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग अंतर्गत उद्योजकांना दिले जाणार आहे. मंगळवारीच मनी लोने यासाठी पंजाब नॅशनल बँकेशी करार केला आहे.

एक्साइड इंडस्ट्रीज (Exide Industries):

देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर, सर्वात मोठी बॅटरी निर्माता कंपनी एक्साइड इंडस्ट्रीजने मल्टी गिगावॅट लिथियम आयन सेल निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या विक्रीवर सबसिडी देण्याची आणि केंद्र सरकारच्या प्रॉडक्शन लँड इंसेन्टिव्ह स्कीममध्ये सहभागी होण्याची योजना आखली आहे. केंद्र सरकारने नॅशनल प्रोग्राम फॉर अॅडव्हान्स केमिस्ट्री सेल अंतर्गत स्टोरेज बॅटरी बनवणाऱ्या कंपन्यांसाठी प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह योजना जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाने हा प्रस्ताव दिला आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation):

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन नवीन कच्च्या तेल पाइपलाइन सिस्टमसाठी गुंतवणूक करणार आहे. ही 17.5 एमएमटीपीए पाइपलाइन मुंद्रा बंदर ते पानिपतपर्यंत टाकण्यात येणार आहे. इंडियन ऑईलने मुंद्रा बंदरात कच्च्या तेलाची टाकी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या पाइपलाइनसाठी एकूण 9028 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प 36 महिन्यांत पूर्ण होईल आणि पानिपत रिफायनरीच्या विस्तार योजनेसह सुरू केला जाईल. यामुळे पानिपत रिफायनरीमधील क्रूडची गरज 15 एमएमटीपीएवरून 25 एमएमटीपीएपर्यंत वाढण्यास मदत होईल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT