zfunds launches 100 rupee daily mutual fund sip for rural areas and small town people  esakal
अर्थविश्व

अरे वा! लाँच झाली 100 रुपयांची SIP, मिळेल गुंतवणुकीची उत्तम संधी

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये एसआयपी (SIP) ची क्रेझ झपाट्याने वाढली आहे. याद्वारे गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. SIP सह, तुम्ही कमी वेळेत पद्धतशीर पद्धतीने चांगली गुंतवणूक करू शकता आणि त्यावर परतावा देखील चांगला आहे. तुम्ही SIP मध्ये किमान 500 रुपये प्रति महिना गुंतवणे सुरू करू शकता.

दरम्यान आता म्युच्युअल फंड (Mutual Fund) डिस्ट्रिब्यूशन प्लॅटफॉर्म ZFunds ने 100 रुपयांची SIP सुरू केली आहे. मात्र ही दररोजच्या आधारावर (Daily Base) एसआयपी आहे. सध्या, SIP मध्ये गुंतवणूक मासिक आधारावर केली जाते. ग्रामीण भागात आणि छोट्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे.

ZFunds द्वारे सांगण्यात आले की, ही SIP आईसीआईसीआई प्रूडेंशियल म्यूचुअल फंड (ICICI Prudential Mutual Fund), एचडीएफसी म्यूचुअल फंड (HDFC Mutual Fund) आणि टाटा म्यूचुअल फंड (Tata Mutual Fund) यांच्या संयुक्त विद्यमाने ऑफर केली गेली आहे.

सहज करू शकता गुंतवणूक

ही योजना सुरू करण्यामागील ZFunds चा हेतू टियर-2, टियर-3 आणि टियर-4 शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंत लवकर पोहोचणे हा आहे. येथील लोकांचे उत्पन्न रोजचे आहे. अशा परिस्थितीत, ते दररोज जमा होणाऱ्या एसआयपीमध्ये सहज गुंतवणूक करू शकतो.

दैनंदिन कमाई करणाऱ्यांसाठी चांगली संधी

कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ मनीष कोठारी म्हणाले की, स्वयंरोजगारात गुंतलेल्या आणि रोजच्या रोज कमाई करणाऱ्या लोकांसाठी हा एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. यात रोजगार करणारे, छोटा उद्योग चालवणारे उद्योजक अगदी सहज गुंतवणूक करु शकतात आणि चांगला परतावा मिळवू शकतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT