zomato
zomato 
अर्थविश्व

उबर इट्सची झोमॅटोकडून तब्बल एवढ्या डॉलरला खरेदी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ऑनलाइन खाद्यपुरवणाऱ्या झोमॅटो या फूड कंपनीकडून उबर इट्स इंडिया या कंपनी अधिकृतरित्या तब्बल 350 मिलियन डॉलरला खरेदी केली आहे. त्यामुळे आता ऑनलाइन फूड पुरविणाऱ्या कंपन्यांतील स्पर्धा कमी झाली आहे.

उबर इट्स ही भारतात आपली छाप सोडण्यात अपयशी ठरली आहे. उबरने 2017 मध्ये ही सेवा सुरु केली होती. भारतात झोमॅटो आणि स्विगी या दोन कंपन्यांनी वर्चस्व मिळविलेले आहे. अखेर यामुळेच उबर इट्स इंडियाने आपली कंपनी झोमॅटोला विकण्याचा निर्णय घेतला. आता उबर इट्सचे फक्त 9.9 टक्के शेअर असणार आहेत. यापूर्वीच झोमॅटो उबर इट्सची खरेदी करणार अशी चर्चा होती, अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

फक्त भारतात उबर इट्सची विक्री करण्यात आली आहे. अन्य देशांमध्ये उबर इट्स आपली सेवा सुरु ठेवणार आहे. उबर कॅब सेवाही पूर्ववत सुरु राहणार आहे. उबर कॅबने या वर्षात आणखी 200 शहरांमध्ये आपल्या सेवेचा विस्तार करण्याचे ठरविले आहे. कॅब सेवेवर लक्ष्य केंद्रीत करण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे. उबर आता बाईक सर्व्हिसकडेही वळणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT