आज जागतिक ते देश पातळीवर काेरोना महामारीने सर्वच व्यवस्था उध्वस्त होणार तर नाहीत ना! अर्थकारणाचे व उद्योग क्षेत्राचे चक्र पुन्हा हळूवार सुरू कसे होईल या विवंचनेत समाज पडला आहे. देशभर शिक्षण क्षेत्र असंख्य सूचना व परिपत्रके व निर्बंध उपक्रम यांच्या अंबलबजावणीने अडखळत आहे, धुसरत आहे. परीक्षा आणि अध्यापन याचा काटेकोर समन्वय साधण्याचे प्रयत्न ही चालू आहेत. प्राथमिक स्तरावरील शिक्षण क्षेत्र प्रंचड अस्थिर व गोंधळले आहे अश्या वेळी तंत्रज्ञान वापरणे दृकश्राव्य वापरणे अनेक युक्त्या व प्रयुक्त करून अध्यापन ही चालू आहे. त्या प्रयत्नास आचार्य विनोबांचे आचार्य कुलाचे विचार उपयुक्त नव्हेत तर अंमलबजावणी करण्याशिवाय पर्याय असणारा नाही.
आपण सूक्ष्मात प्रवेश केला आहे असा अध्याम्रिक गूढ दावा करणारे विनोबा पवनार येथील एका गीताई शिबिरात समारोप प्रसंगी जाणीव पूर्वक म्हणाले "माझिये जातीचे मज भेटो कोणी" असे विधान करून आचार्य कुल शिबिरास आलेल्या सहभागींना लेखी प्रश्न विचारण्यास सांगण्यात आले तेव्हा एकाने लिहून प्रश्न दिला. " तुम्ही चार्तुवरण्य मानता का? या प्रश्नाला विनोबांनी उत्तर दिले तेही एका शब्दात हो असेच. त्यानंतर विनोबा लगेच म्हणतात गीता प्रणित करोण उत्तर काळात जगभर वंशवाद हेच श्रेष्ठत्व विखारी पद्धतीने रुजवून त्याला राज्यकर्ता वर्ग सामर्थ्य देत आहे. वंशवाद हाच प्रभुत्व वाद लादणे व त्यास आधी मान्यता देणे चालू आहे.
अश्या भय काळात विनोबांचे नेहमीच्या शैलीची विधाने ही तपासून घ्यायला हवीत ते आचार्य शिबिरात माझिया जातीचे मज भेटो कोणी असे ते जाणीव पूर्वक अभंग वचन का नमूद करतात कारण शिक्षणक्षेत्रात आचार्य हे या पक्षपाती विचार पासून दूर असावेत. त्यांनी विद्यार्थ्यांवर जातीच्या पलीकडे जावून विशुध्द अंतकरणाने व्रतंन करावे हिच केवळ विनोबांची देशातील सर्व आजच्या सर्व शिक्षकांकडून अर्थातच आचार्यंकडून. विनोबा हे गीताई मंदिरात क्षीण आवाजात सांगतात बच्चोंको बचाआे असे सांगणारे विनोबा यांना आचार्य कुल हेच बच्चे बचाव हे कार्य करा त्या मुलांनावर अर्थातच जग सुखी कसे होईल हे हेच आचार्यांनी काम करावे. ते सगुण व निर्गुण यातील फरक सांगताना स्पष्ट करतात सगुण म्हणजे दिवस व निर्गुण म्हणजे रात्र होय पण चक्र जग सुखी करण्यासाठी कष्ट करण्यासाठी व्यतीत करावे हे विनोबांचे शिक्षण विचार खूप व्यापक आहेत.
विनोबांच्या आचार्य कुल प्रयोगाचा कर ओणा उत्तर काळात समाजातील प्रत्येक घटकाने स्वीकार करण्याचा अनुषंगाने विचार व्हायला हवा. सहा मार्च 1968 रोजी बिहारमधील कहोल मुनीच्या आश्रमात देशातील अनेक विद्यापीठाचे कुलगुरू शिक्षण मंत्री नेते व कार्यकर्ते यांचे पुढे आचार्य कोणास म्हणावे हेही स्पष्ट केले होते. आचार विचार प्रं चार आणि संचार जो करतो तो आचार्य होय. आचरण म्हणजे आचार व सदाचाराचे आचरण म्हणजेच तो विचार होय, जो सतत नव नवा जगाच्या विकासाचा विचार करतो कार्याला गती देतो तो आचार्य होय. विनोबा हे शिक्षकालाच आचार्य मानत नाहीत तर ते म्हणतात प्रत्येक क्षेत्रातील जिज्ञासू अनुभवी तज्ज्ञ हा ही आचार्य असतो असायला हवा. त्याने मार्गदर्शन करावे ही विनोबांच्या कौशल्य व ज्ञान क्षमता असणाऱ्या व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात प्राधान्य असावे ही भूमिका विनोबा पश्चात आचार्य प्रयोग परिवारात स्वीकारली गेली नाही हे आजचे वास्तव आहे.
विनोबा आचार्यांच्या निष्ठा नमूद करताना म्हणतात या क्षेत्रातील प्रत्येकाने विद्यार्थी निष्ठा ज्ञान तसेच समाज निष्ठा बाळगायला हवी. आजचे शिक्षण क्षेत्रात या वर आत्म चिंतन जरी केले तरी विनोबांना त्यांच्या स्मृती दिननिमित्त अभिवादन केल्या सारखे होईल. आजचा शिक्षक अर्थातच आचार्य हा निर्भय व निर्वेर असावा सयंम व आत्मविश्वास पूर्वक वागणारा असा वां त्यांच्या अंगी अहिंसा व निक्ष पक्षता असावी त्याने मानव कल्याणाची विश्व व्यापक भूमिका घेवून काम करावे. एकादा विनोबा तर म्हणाले होते की मी सतत हसतो कारण मला रडता येत नाही पण आतमध्ये मला वेदना होत आहेत म्हणून माझा आग्रह आहे आजच्या समाजाला वाचविणाऱ्या ज्या दोन शक्ती आहेत. त्यातील ग्राम शक्ती जी त्या जनतेच्या अंगी आहे फक्त तिचा वापर होत नाही. दुसरी म्हणजे आचार्य शक्ती म्हणजेच सज्जन लोक विद्वान लोक शिक्षक हेच देशाला तारक आहेत तेच पूरक आहेत त्यांच्या प्रेम मय, ज्ञान मय व समन्वय साधून मुक्तीचा मार्ग आचार्यांनी दाखविणे स्वत त्या मार्गावरून चालणे त्यातूनच गाव करील ते राव करील काय ?हे दाखवून द्यावे
विनोबा म्हणत भारतात सज्जन लोक खूप.आहेत पण सज्जन शक्ती नाही ते एकात्रित येत नाहीत त्यांनी एकत्रित यावे व्यक्ती समाज व राष्ट्र या तिन्हींची आत्म शक्ती वाढवून आत्मं अनुशासन क्षमता तयार करावी शिक्षण स्वतंत्र व स्वायत्त असावे. सर्व घटकांनी शांत. व स्वस्थ मानव समाज तयार करण्यासाठी अहिंसक पद्धतीने काम करावे तशी लोक शक्ती तयार करून लोक निती तयार करावी हा विनोबांचा आचार्य कुल उद्यिष्टे विचार नव्या पिढीने तपासून तरी पाहायला हवा त्यांची चर्चा करायला पाहिजे. विनोबांच्या आचार्य वर्गाकडून सज्जन व विद्वान यांनी काठावर उभे न राहता प्रत्यक्ष रणभूमीवर काम करायला हवे सोपे काम सर्वच करतात पण आचार्यांनी कठीण काम करण्यास पुढे यायला हवे त्यातून जय जगत जय विज्ञान या दिशेने स्वयं अनुशासन करणारा समाज तयार होईल.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.