Sachin Tendulkar Birthday | America 5 percent GDP Barack Obama sakal
Blog | ब्लॉग

Sachin Tendulkar : सचिन बॅटींगला उतरला तर अमेरिकेचं 5% उत्पादन घटायचं; बराक ओबामांनी सांगितलेला किस्सा!

Sachin Tendulkar Birthday: ओबामांच्या VVIP डिनरमध्ये सचिन तेंडुलकरचंही होतं नाव!

सकाळ वृत्तसेवा

- चेतन झडपे

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आज (24 एप्रिल) जन्मदिवस. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशामध्ये सचिनची क्रेज आजही प्रचंड मोठी आहे. ती तसूभरही कमी झालेली नाही. क्रिकेट हा जर काही जणांसाठी एक स्वतंत्र धर्म असेल, तर या धर्माचा देव सचिन तेंडुलकर आहे.

क्रिकेट आवडणाऱ्या साऱ्यांचाच सचिन हा लाडका फलंदाज पण, सचिनचा प्रभाव क्रिकेट खेळणाऱ्या देशापर्यंत मर्यादित नाही. क्रिकेटच्या बाहेर ही सचिनचे चाहते भरून पडलेले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष हे सुद्धा सचिन तेंडलकरचे मोठे चाहते आहेत. त्यांनी सचिनबाबत जे काही म्हणून ठेवलंय, ते आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी सचिन तेंडुलकरची प्रशंसा केली होती. ओबामा म्हणाले होते, "मला क्रिकेट या खेळाबद्दल फारशी माहिती नाही. पण, तरीही मी सचिन तेंडुलकर फलंदाजी करत असताना क्रिकेट आवर्जून पाहतो. यासाठी नाही की, मला सचिनचा खेळ फार आवडतो."

'पण, मला हे जाणून घ्याचचं होतं की, असं काय कारण आहे की, जेव्हा सचिन तेंडुलकर फलंदाजीसाठी उतरतो, तेव्हा माझ्या देशाचं उत्पादन पाच टक्क्यांनी कमी होतं." असे गौरवोद्गार बराक ओबामा यांनी सचिनसाठी काढले होते.

ओबामाचं हे वक्तव्य अमेरिकेत स्थायिक होऊन, तिथेच नोकरी करणार्‍या त्या तमाम अनिवासी भारतीय नागरिकांसाठी होतं, जे सचिन फलंदाजीसाठी उतरला तर अक्षरशः वेडे होऊन क्रिकेट पाहायचे. याचा परिणाम थेट जगात महासत्ता असलेल्या अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडत असे.

ओबामांसोबत डिनरसाठी सचिनचं व्हिव्हिआयपी सूचीत नाव -

बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते एकदा भारतभेटीवर आले होते. बराक ओबामांच्या या भारत दौऱ्यात भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ओबामांसोबत काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसह डिनर आयोजित केले होते. या डिनरसाठी व्हिव्हिआयपी व्यक्तींच्या यादीत एक नाव सचिन तेंडुलकर असंही होतं. ओबामा सचिनचे प्रशंसक होते. या यादीत सचिनचं नाव नसतं तरच आश्चर्य वाटलं असतं!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT