Swaranjali Kulkarni 
Blog | ब्लॉग

खरं तर हेच "दुहेरी यश...

स्वरांजली कुलकर्णी, फलटण

आज मीनाक्षीला उठायला जरा उशीरच झाला होता. त्यामुळे सकाळपासून तिची गडबड चालू होती आणि नेमक्‍या आज कामवाल्या मावशी पण येणार नव्हत्या. त्यामुळे मीनाक्षीला जरा टेंशनच आलं होतं आणि त्यात भरीस भर म्हणून एरवी सकाळी दहा वाजता ऑफिस असणाऱ्या सुजयला आज बॉसनी सकाळी फोन करून नऊ वाजता बोलावले होते. त्यामुळे सुजयचा डबा, तिचा डबा, स्वयंपाक, भांडी, पोळ्या ही सर्व कामे तिच्या अंगावर पडली. परंतु; आजचा दिवस मीनाक्षी, सुजय आणि पीयूष यांचासाठी खूप महत्त्वाचा होता. पीयूषची आज धावण्याची अंतिम स्पर्धा होती आणि गेले कित्येक दिवस पीयूष त्यासाठी अगदी अंग झटून मेहनत घेत होता. पीयूषची त्याच्या शाळेकडून या स्पर्धेसाठी निवड झाली होती आणि आज शहरातील इतर निवड झालेल्या प्रतिस्पर्ध्यांबरोबर त्याची स्पर्धा होती. यासाठी पीयूषने खूप मेहतन घेतली होती आणि मीनाक्षी पण पीयूषला प्रॅक्‍टिससाठी रोज मैदानावर सोडणे, त्याला पोषक नाश्‍ता करून देणे, त्याच्या खाण्याची तयारी करून ठेवत होती व लहानगा पीयूषसुद्धा या सर्व गोष्टी मनापासून करत होता. अखेर तो स्पर्धेचा दिवस आज उजाडला. त्यामुळे मीनाक्षीने आज हाफ डे घेतला होता आणि सुजय ऑफिसला निघताना तिने पुन्हा एकदा लवकर येण्याची आठवण करून दिली. "ऑल द बेस्ट पीयू' असे म्हणून सुजय ऑफिसला निघून गेला. पीयूषने त्याला हाताने बाय बाय केले. 


पीयूषची आज स्पर्धा असल्याने त्याला शाळेला सुटी होती म्हणून मीनाक्षीने पीयूषचा डबा भरून त्याला शेजारच्या काकूंकडे सोडून ती शाळेत जायला निघाली. मीनाक्षी लहान मुलांच्या शाळेत शिक्षक होती. दोन वाजता तिने मुख्यधापिकेच्या हातात "हाफ डे'चा अर्ज सोपवून ती घरी येण्यासाठी निघाली. घरी येऊन ते दोघे मैदानाकडे रवाना झाले. मैदानावर पीयूषच्या शिक्षकांनी पीयूषला बोलावले. सर्व मुलांना मैदानाच्या एका बाजूला बोलावून घेतले. मीनाक्षीने पीयूषच्या चेहऱ्यावर हात फिरवून त्याला "ऑल द बेस्ट' दिले. पीयूषने पण त्यावर छानशी स्माईल दिली आणि तो मैदानाकडे निघाला. थोड्या वेळानं सुजय तेथे आला. सुजयने पीयूषला मैदानात पाहून लांबूनच "ऑल द बेस्ट' दिले. स्पर्धा सुरू व्हायला दहा मिनिटे बाकी होती. सर्व मुले मैदानात उतरली होती. जसजसा वेळ पुढे जात होता तसतसं सर्व मुलांच्या चेहऱ्यावर थोडेसे टेंशन दिसत होतं. खेळ सुरू व्हायच्या दोन मिनिटे आधी पंचानी मुलांना रेडी राहण्याचा इशारा दिला आणि दोन मिनिटांनंतर पंचांनी रेस स्टार्ट असा शिट्टी वाजवून इशारा दिला. 


सर्व मुले जोरात पळत होती. प्रत्येक जण आपल्याला जिंकायचं ही इच्छा मनात धरून पळत होता. पीयूष पहिल्यांदा दुसऱ्या नंबरवर होता. पण, नंतर तो पहिल्या नंबरवर गेला व बराच वेळ पहिल्या नंबरवर होता. सर्व मैदानाभोवती असलेली मुले, पालक जल्लोष करत होते. मीनाक्षी आणि सुजयसुद्धा खूप उत्सुकतेने, थोड्या टेंशनने स्पर्धा पाहत होते. पीयूष आणि रोहन अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकावर पळत होते आणि शेवटच्या काही सेकंदात रोहनने पीयूषच्या आधी सीमारेषा ओलांडली...रोहनचा पहिला, तर पीयूषचा दुसरा नंबर आला. पीयूषला थोडं वाईट वाटलं आणि तो जोरात ओरडला... "ओह'. ते ऐकून मीनाक्षी आणि सुजय मैदानाच्या दिशेने वेड्यासारखे धावत सुटले आणि त्यांनी पीयूषला मिठीत घेतले. त्या दोघांनी पीयूषचे पापे घेतले आणि एकमेकांकडे पाहून ढसाढसा रडायला लागले. हा सर्व प्रकार तिथल्या पंचांनी पाहिला. पण, त्यांच्या काही लक्षात आला नाही. मग, पंचांनी न राहवून सुजय-मीनाक्षीला विचारले "काय झालं, तुम्ही अचानक रडायला का लागलात?' त्यावर सुजय शांतपणे म्हणाला, "कारण जन्म झाल्यानंतर पीयूष आज पहिल्यांदाच बोलला आहे आणि त्यामुळे आज त्याने फक्त खेळाच्या स्पर्धेत नव्हे तर आयुष्याचा स्पर्धेत पण यश मिळवले आहे...खरं तर हेच "दुहेरी यश...' 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अफगाणिस्तानमध्ये भारतीयांना मिळणार मोफत प्लॉट; तालिबान सरकारने का केली मोठी घोषणा?

Forest Department Scheme: राज्याच्या विविध भागात माकड-मानव संघर्ष, उपद्रवी माकडे पडणाऱ्यास ६०० रुपये प्रोत्साहन!

IND vs SA 2nd Test Live: भारताचा कसोटी मालिकेतील सर्वात मोठा पराभव; Rishabh Pant म्हणतो, थोडसा निराश आहे, पण...

Video : महिपत अडकला अर्जुनच्या जाळ्यात; प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाला "आया उंट पहाड के नीचे"

Latest Marathi News Live Update : वरणगाव नगर परिषदेत चौरंगी लढत

SCROLL FOR NEXT