हलव्याच्या दागिन्यांचा गोडवा  
Blog | ब्लॉग

हलव्याच्या दागिन्यांचा गोडवा 

समृद्धी धायगुडे

संक्रांत हा नववर्षात येणारा पहिलावहिला सण. या सणाला नवविवाहित दांपत्यांना आणि बालकांना हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे. दरवर्षी संक्रांतीला घरातले नातेवाईक विशेषत: सासूबाई आपल्या घरात आलेल्या सून-जावयासाठी आकर्षक दिसणारे हलव्याचे दागिने घेतात. ही प्रथा जरी जुनी असली तरी यामध्ये दरवर्षी नवनवीन वस्तूंची यादी ऍड होत जाते. त्यामुळे हलव्याच्या दागिन्यांमध्ये बदलत गेलेल्या या ट्रेंडमध्ये नक्की कोण-कोणती आभूषणे दाखल झाली आहेत ते बघूया... 

- नवविवाहित दांपत्यांपैकी सुनेला पारंपरिक हलव्याच्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, बांगड्या, मुकुट असे प्रकार दिसतात. दागिने कोणतेही असोत महिला वर्गाचा उत्साह तितकाच भरपूर असतो. सोन्याच्या दागिन्यांमध्ये जितके प्रकार दिसतात, तितकेच प्रकार आता हलव्याच्या दागिन्यांमध्ये आले आहेत. बिंदीपासून जोडव्यांपर्यंत ही आभूषणे सध्या नव विवाहितांमध्ये लोकप्रिय होत आहेत. 

- संक्रांतीला वाटल्या जाणाऱ्या या छोट्या-छोट्या हलव्यापासून नाजूक बिंदी, कानातल्याचे अनेक प्रकार यामध्ये टॉप्स, झुबे, वेल, गळ्यात चिंचपेटी, नेकलेस, तन्मणी, राणी हार, गाजरी हार यांसारखे प्रकार, कंबरेच्या आभूषणांमध्ये छल्ला, मेखला, कंबरपट्टा, विविध मालिकांच्या निमित्ताने अभिनेत्रींच्या दागिन्यांची फॅशन आपल्यापर्यंत पोचते. यापैकीच एक दागिना म्हणजे नथ, म्हाळसा आणि बानू नथीचा हा प्रकार सध्या प्रचंड लोकप्रिय झाला आहे. जवळपास अशाच धाटणीच्या नाजूक नथी आता हलव्याच्या दागिन्यांमध्येही दिसत आहेत. 

- पाटल्या, बांगड्या, वाकी, जोडवी, विरुद्या तसेच काही हौशी ग्राहक कस्टमाइज हलव्याची साडी, साडीवर लावायला ब्रूच, हलव्याची पर्स असे प्रकार आवर्जून करून घेतात. 

- हलव्याच्या दागिन्यांची व्हरायटी केवळ मुलींमध्येच आहे असे नाही तर मुलांसाठी महाराजा सेटमधील फेटे, पुणेरी पगडी, उपरणे आणि मोस्ट स्टायलिश ऍटिट्यूड देणारी भिकबाळी समस्त जावयांना भुरळ घालत आहेत. मुलांच्या ऍक्‍सेसरीजपैकी टायपिन, पेन, स्मार्टफोन युग म्हटल्यावर मोबाईल हवाचं, मनगटी घड्याळ, अंगठी या बरोबर पारंपरिक नारळ आणि गळ्यात हार हे दागिने तर आहेतच. 

- ही सर्व आभूषणे आता नामांकित दुकानांमध्ये किंवा हलव्याचे दागिने बनविणाऱ्या कलाकारांकडे, तसेच ठराविक ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट्‌सवर उपलब्ध आहेत. परदेशात असलेल्या तुमच्या जावई किंवा सुनेला असे पूर्ण किट सहज ऑनलाइन पाठवू शकता. आपल्या हौशीनुसार आणि आवडीनुसार या हलव्याच्या दागिन्यांचे सेट मिळतात. लहान मुलांसाठीचे देखील दागिने बाजारात आले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSRP Deadline Rule: आता दंड की सवलत? अंतिम मुदतीनंतरही HSRP नंबर प्लेट बदलली नसेल तर काय होणार? जाणून घ्या नियम...

Ikkis Movie Review: भारतमातेच्या वीरपुत्राची शौर्यगाथा; कसा आहे धर्मेंद्र' यांचा शेवटचा चित्रपट 'इक्कीस'

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात विकासाची पवनचक्की फिरतेय; पण शेतकरी व बेरोजगारांचे प्रश्न अनुत्तरितच!

Oppo Reno 15 Series Launch Date : तब्बल 200 मेगापिक्सेल कॅमेरा असणाऱ्या ‘Oppo Reno 15’ सीरीजची भारतातील ‘लाँच डेट’ जाहीर!

Latest Marathi News Live Update: पुण्यात सापडली ६७ लाखांची रोकड

SCROLL FOR NEXT