व्हाइट ब्युटी  
Blog | ब्लॉग

व्हाइट ब्युटी 

समृद्धी धायगुडे

प्रजासत्ताकदिनानिमित्त बाजारात पांढऱ्या रंगाच्या कपड्यांची तसेच ऍक्‍सेसरीजची प्रचंड व्हरायटी आलेली दिसते. शाळा, महाविद्यालये किंवा इतर सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होताना विशेष करून पांढऱ्या रंगांच्या सोबर रंगाच्या कपड्यांना प्राधान्य दिले जाते. वेगवेगळ्या निमित्ताने तुमच्या वॉर्डरोबमधील "पांढऱ्या' रंगाच्या नाजूक वर्क असलेल्या ड्रेस'ला आता जरा हवा लागू द्या. 

- व्हाइट कॉम्बिनेशनमधील ट्रॅडिशनल वेअर पाहायला मिळतात. तुम्हाला कॅज्युअल्सची आवड असल्यास केशरी, पांढरा, हिरवा अशा ट्रायकलरमधील कपडे बाजारात उपलब्ध आहेत. 
- ड्रेसच्या पांढऱ्या रंगामुळे आपल्याला त्यावर वेगवेगळी नक्षी, रंगीत पॅचवर्क, एम्ब्रॉयडरी आणि थ्रेडवर्क करता येते. त्यामुळे तुमचा ड्रेस, स्कर्ट चार चौघींमध्ये उठून दिसतो. 
- व्हाइट कलरमध्ये लखनवी,चिकनचे, ज्यूट, सिंथेटिक मटेरियलचे टॉप, कुर्ते तसेच सलवार, पटियाला, चुडीदार, घेरदार स्कर्ट असे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. या व्हाइट कलरसोबत नेव्ही ब्ल्यू, ऑरेंज, लेमन, पिंक असे कॉम्बिनेशन जुळते. 
- कधी-कधी पांढऱ्या कपड्यांच्या पोतातच विशिष्ट प्रकारचं नक्षी काम असतं. त्यामुळे त्यावर वेगळं डिझाइन करण्याची गरज नसते. एखादा गडद रंगाचा स्टोल, स्कार्फ असल्यास तो तुम्ही प्लेन कुर्ती, ड्रेसवर कॅरी करू शकता. प्लेन व्हाइट सलवार-कमीजवर मल्टीकलर दुपट्टा क्‍लास दिसतो. 
- व्हाइट ड्रेसेसवर खूप हेवी मेकअप नसावा. मेकअप करायचाच असल्यास न्यूड लिपग्लॉस, फ्रूट लिपबाम लावा. संध्याकाळी जुन्या मैत्रिणींसमवेत गेट टूगेदर, पार्टी असल्यास आय मेकअप करणे गरजेचे ठरेल. यासाठी व्हाइट आयशॅडो आणि लाल, पर्पल लिपस्टिक असे रंग शोभून दिसतील. पांढऱ्या ड्रेसवर ज्वेलरी घेताना सगळ्या प्रकारचे दागिने घालण्याचे स्वातंत्र्य मिळते. व्हाइट स्टोनपासून केलेले किंवा ऑक्‍साईड ज्वेलरीही यावर उठून दिसते. मोत्याचे दागिने घातल्यास आणखी एक वेगळा लुक मिळेल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSRP Deadline Rule: आता दंड की सवलत? अंतिम मुदतीनंतरही HSRP नंबर प्लेट बदलली नसेल तर काय होणार? जाणून घ्या नियम...

Ikkis Movie Review: भारतमातेच्या वीरपुत्राची शौर्यगाथा; कसा आहे धर्मेंद्र' यांचा शेवटचा चित्रपट 'इक्कीस'

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात विकासाची पवनचक्की फिरतेय; पण शेतकरी व बेरोजगारांचे प्रश्न अनुत्तरितच!

Oppo Reno 15 Series Launch Date : तब्बल 200 मेगापिक्सेल कॅमेरा असणाऱ्या ‘Oppo Reno 15’ सीरीजची भारतातील ‘लाँच डेट’ जाहीर!

Latest Marathi News Live Update: पुण्यात सापडली ६७ लाखांची रोकड

SCROLL FOR NEXT