Rahul Gandhi BJP Sakal
Blog | ब्लॉग

Rahul Gandhi: 'बडा घर पोकळ वासा' भाजप सारखा आक्रमकपणा काँग्रेस कधी दाखवणार?

आणि मग काँग्रेसवर नेहमीप्रमाणे लोकशाही धोक्यात, ईडी-सीबीआयचा गैरवापर ईव्हीएम आणि तद्दन निरुपयोगी मुद्दे कुरवाळत बसावे लागतील.

वैष्णवी कारंजकर

राज्यात काय चाललंय? असं कोणी विचारलं, तर पहिल्यांदा डोक्यात येतात त्या म्हणजे विविध पक्षांच्या एकमेकांवर कुरघोडी कऱण्यासाठी भरवण्यात येणाऱ्या सभा. एकमेकांवर खालच्या भाषेत टीका करणं हा एक समान पॅटर्न. आता शिवसेनेतल्या बंडानंतर एकमेकांची जुनी गुपितं, घोटाळे, जुन्या घटना फोडणं हे प्रकारही वाढले आहेत.

शिवसेनेचाच मुद्दा घेऊ. एकनाथ शिंदे ४० आमदार अन् १२ खासदारांसह बाहेर पडले, सरकार स्थापन केलं. त्यानंतर ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा दिसून आला. राज्यभर सभा घेणं, पदाधिकाऱ्यांना भेटणं, दिसेल त्याच्यासोबत युती करणं, सुषमा अंधारेंसारख्या एकेकाळी शिवसेनेवर अर्वाच्य टीका केलेल्या व्यक्तीलाही पक्षात घेणं, असे वाट्टेल ते मार्ग चोखाळत आहे. जनप्रक्षोभ मोर्चा, शिवसंवाद यात्रा, तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाबद्दलच्या पुड्या सोडून शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांवर दबाव टाकणे अशा अनेक स्ट्रॅटेजी त्यांच्याकडून वापरण्यात येत आहेत.

हातात मोजकेच आमदार, मोजक्याच भागांमध्ये सत्ता, फारसे प्रभावी नसलेले आमदार, खासदार सोबत असतानाही जे ठाकरे गटाला जमतंय (किंबहुना ते प्रयत्न करतायत) ते एकेकाळी देशातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला का जमलं नाही?

काँग्रेस म्हटलं की सध्या एकच विषय आठवतो, तो म्हणजे राहुल गांधींची रद्द झालेली खासदारकी. काय विधान होतं राहुल गांधींचं ज्यामुळे खासदारकी रद्द झाली? तर 'मोदी आडनावाचे सगळेच चोर कसे काय असतात?' खरंतर अशी विधानं देशाला नवीन नाहीत. किंबहुना याहीपेक्षा खालच्या दर्जाची विधानं सध्या फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणातही होत आहेत. मग राहुल गांधींनी असं काय केलं?

असो, ते दोषी आहेत की नाही, हा मुद्दा अतिशय वेगळा आहे. मात्र काँग्रेसने त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर एवढी मोठी कारवाई झाली, पण बैठक घेऊन पुढची वाटचाल ठरवू, असं आश्वासन देण्याशिवाय काहीही केलं नाही. काँग्रेसचा हा नेभळटपणाच उद्या त्यांच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरू शकतो, असा विचार सर्वोच्च नेत्यांच्या मनात येत नसेल का?

विरोधी पक्षांमधले मतभेद, इगो इश्यूज हेही काही नवीन नाहीत. पण तुमच्या मित्र पक्षातल्या किंवा तुमच्याच पक्षातल्या सर्वोच्च नेत्यावर जर अशा प्रकारे कारवाई होत असेल, तर उद्या तुम्हीही आयुष्यातून उठू शकता, राजकीय करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं, असा विचार काँग्रेस नेत्यांच्या मनात का येऊ नये?

राहुल गांधी यांनी मोदींबद्दल केलेलं ते विधान राहिलं बाजूला. पण त्यानंतर राहुल गांधींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी सावरकरांचं नाव काय घेतलं? भाजपा अगदी संधी मिळाल्याप्रमाणे तुटून पडली. गल्लीबोळापासून दिल्लीपर्यंत भाजपाने सावरकर गौरव यात्रा काढली, मिळेल त्या माध्यमातून राहुल गांधींवर तसंच स्थानिक विरोधी नेत्यांवर बोचरी टीका कऱण्यास सुरुवात केली.

मात्र विरोधकांकडून याला ना कृतीतून उत्तर दिलं जात आहे, ना शब्दांमधून. आता संजय राऊत तसे प्रयत्न करत आहेत. पण रोज सकाळी १० वाजता माध्यमांसमोर बसून बोलण्याशिवाय तेही कोणता कृती कार्यक्रम करत नाहीत. भाजपा आपल्या प्रत्येक नेत्याला सांभाळून घेते, मग त्याची चूक असो वा नसो. आता हे सांभाळून घेणं बरोबर आहे की चूक? या वादात पडायला नको.

पण भाजपा जर कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही थराला जाऊन आपली विचारधारा, आपले नेते यांचा बचाव कऱण्यासाठी आक्रमक पवित्रा घेऊ शकतं. तर त्यांना हरवण्यासाठी तयारी करणारे विरोधक एकत्र येऊन का लढत नाहीत? राहुल गांधींना झालेल्या शिक्षेच्या निमित्ताने काँग्रेसला सहानुभुती मिळवण्याची चांगली संधी होती. मात्र त्यांनी ती संधी सध्या तरी गमावली आहे, असं दिसतं. आता अजूनही त्यांच्या याबद्दल बैठकाच सुरू असतील, तर मात्र तोवर भाजपा वेगळाच मुद्दा काढून वातावरण आपल्या बाजूने वळवून घेईल. आणि मग काँग्रेसवर नेहमीप्रमाणे लोकशाही धोक्यात, ईडी-सीबीआयचा गैरवापर ईव्हीएम आणि तद्दन निरुपयोगी मुद्दे कुरवाळत बसावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Israel Gaza Conflict: गाझावर पुन्हा हल्ल्याची तयारी; इस्राईलचा पवित्रा, हमासचे सक्रिय गट लक्ष्य करणार

Krishna River Flood Sangli : कृष्णा नदीचे पाणी सांगलीत घुसले, पाणी पातळी गेली ४० फुटांवर; कोयनेचा विसर्ग स्थिर, चांदोलीतून कपात

Maharashtra Latest News Update: उजनी धरणातून तब्बल 1 लाख 41 हजार 600 क्युसिक विसर्गाने पाणी भीमा नदीत केला

SCROLL FOR NEXT