Curfew, uh ... yeah ... It's time to learn new things ...! 
Blog | ब्लॉग

कर्फ्यू, छे... छे... हा तर नवनवीन गोष्टी शिकण्याचा काळ...!

संजय पाठक - सकाळ वृत्तसेवा

कोरोनाने लागलेला कर्फ्यू पूर्वी एंजॉटमेंटमध्ये गेला, आता मात्र मनात चिडचिडेपणाची भावना निर्माण करणारा ठरत आहे. घरत बसून बसून बोअर होतंय, वेळ जाता जात नाही. बरं टीव्ही लावावं तर त्याच त्या कोरोनाविषयीच्या बातम्या, सोशल मीडियावर तेच ते जोक अन्‌ माथा भडकावणाऱ्या पोष्ट. अशावेळी चिडचिडेपणात भरच पडणार नं. अशावेळी आपले मन शांत राहून मनात सकारात्मक विचार जोपासण्याविषयी काय करता येईल याचा विचार करता करता एक लक्षात आलं की ध्यानधारणा, प्राणायाम, सूर्यनमस्काराने हे शक्‍य आहे. परंतु, यापूर्वी यातील एकही प्रकार अंगीकारला नसेल तर कसं काय...? अर्थात हा प्रश्‍न बरोबरच आहे, पण त्यावर उत्तरही आहे. सध्या सुरू असलेला कर्फ्यूच्या सुटीचा उपयोग आपल्यापैकी प्रत्येकाने नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी खर्च करायचे ठरवले तर आपल्याला काहीच अशक्‍य नाही. बरोबर नं...! 

कोरोना माणसाची प्रतिकार शक्ती कमी करतो. त्यासाठी आपण शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त व सक्षम होणे गरजेचे आहे. पण रोजच्या कामाच्या व्यापात व्यायामाचा एक शब्दही उच्चारणे शक्‍य नाही तिथं व्यायामास वेळ देणं कसं शक्‍य आहे, असा विचार मनात येणं स्वाभिविकच. एका दृष्टीने हे बरोबरच आहे. पण आपल्या दिनचर्येत, वैचारिक प्रक्रियेत बदल करण्याची हीच ती वेळ आहे. यासाठीच पसायदान योग संस्कार वर्गाच्या आरती मिलिंद गोरटे यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेऊयात. 

सौ. गोरटे म्हणतात, कोरोना विषाणूचा प्रभाव आणि प्रादुर्भाव शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त व्यक्तीला होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे सूर्यनमस्कार, व्यायाम प्रकार, योगासने व प्राणायाम अशी साधना नियमित करणे आवश्‍यक आहे. सद्यस्थितीत आपण सर्वजण कुटुंबासोबत एकत्र आहोत. त्यांच्यासोबत पुरेसा वेळ घालवत आहोत ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. आपणावर कर्फ्यूमुळं आलेली बंधने जर थोडासा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर आपल्यासमोर नवनवीन गोष्टी शिकण्याची, वेळेचे उत्तम नियोजन करण्याची, शरीराला व्यायामाची सवय लावण्याची संधी चालून आली आहे, असे मानता येईल. 
 

साधना केल्यानंतर होणारे फायदे 
- सूर्यनमस्कार ः प्राणायामाचा अंतर्भाव, विविध आसनांची साखळी, मंत्रांचे सामर्थ्य आणि सूर्यनारायणाची उपासना असलेला परिपूर्ण असा हा सर्वोत्कृष्ट व्यायाम प्रकार आहे. यात शरीराला सर्व बाजूंनी ताण व दाब देण्याची योजना आहे. 

- प्राणायाम ः यामुळे अफाट अद्‌भुत आणि आनंददायी विश्‍व शक्तीसोबत स्वतःला जोडून घेता येते. तसेच याने अंतर्बाह्य मनाची शुद्धता होते. 

- ॐकार साधना ः चेतासंस्था तणावरहित होते, दमसास टिकवण्यासाठी उपयोग होतो, मनःस्वास्थ्य व मन स्थैर्य लाभते, मनाची एकाग्रता वाढते, वाणी शुद्ध व स्पष्ट होते, अस्थमा व अन्य श्‍वसन समस्या कमी होण्यास मदत होते, उच्च रक्तदाब, मनावरील ताणतणाव नियमित ॐकार जपाने कमी होतात. 

- ध्यान ः शांत बसून स्वतःच्या आत डोकावणे, स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, शब्दांविना स्वतःशीच सुसंवाद करणे म्हणजेच ध्यान. 

महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT