Hawaii Wildfires
Hawaii Wildfires 
Blog | ब्लॉग

Hawaii Wildfires : अमेरिकेतल्या माउई बेटावरील अग्निकांड, समुद्रात उड्या टाकल्याने अनेकांचा मृत्यू

विजय नाईक,दिल्ली

Hawaii Wildfires Update : हवाईच्या आठ बेटांपैकी ओआहू, माउई, बिग आयलँड व कौवाई पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या चार बेटांपैकी माउई बेटावर 8 व 9 ऑगस्ट रोजी लागलेल्या भयानक आगीने प्रशांत महासागराच्या तीरावरील अयतिहासिक लहैना हे उपनगर जवळजवळ बेचिराख झालं. आजवर 55 लोकांना प्राण गमवावे लागले.

त्याची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हजारो पर्यटक तिथं अडकले. गेल्या दोन दिवसात सुमारे तीस हजार पर्यटकांनी माउईहून अक्षरशः पयालयन केलं. हवाईच्या सरकारनं एकामागून एक विमाने पाठवून त्यांना होनोलुलुला आणलं.

होनोलुलुत आम्ही राहातोय. काही दिवसापूर्वी दिवसापूर्वी प्रशांत महासागरात `डोरा’ वादळ आले होते. त्याचा वेग ताशी एक हजार कि.मी होता. त्याचे झंझावाती वारे होनोलुलुवर आदळत होते. परंतु, त्याची तीव्रता वेग माउई व बिग आयलँडवर सर्वाधिक होता. लहैना याचा हवाईयन भाषेतील अर्थ `निर्दयी सूर्य (क्रुएल सन)’.

हवामान बदलांचा जगातील निरनिराळ्या देशांवर जसा परिणाम होतोय, त्यातून हवाईची बेटेही सुटलेली नाहीत. मुळातच त्यांना बनवलय ते ज्वालामुखींनी. अनेक वर्षानंतर बिग आयलँड वरील मौना लुआ गेल्या वर्षी सक्रीय झाला. त्यातून लाव्हा वाहू लागल्याने रस्ते बंद करावे लागले. तेथील किलाउआ ज्वालामुखी अधुनमधून सक्रीय होतो.

माउईची लोकसंख्या केवळ 13 हजार. पण, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी तिथं रोज पर्यटक येतात. येथील कानापल्ली किनारा, हाना हायवे, त्यातील निसर्गरम्य वनराई, हालेकेला पर्वतावरून दिसणारा विलक्षण सुंदर उगवता व मावळता सूर्य पाहाण्यासाठी, समुद्री खेळ खेळण्यासाठी, स्नॉर्केलिंग, स्कूबा डायव्हींग, पॅरा सेलींग, वॉटर स्कींइंग, बोर्ड सर्फिंग यासाठी पर्यटकांची एकच गर्दी असते. लहैनाच्या किनाऱ्यावर असलेल्या बोटीतून व्हेल पाहाण्यासाठी सहली जातात.

त्या किनाऱ्यावर कामेहमेहा राजघराण्याच्या काळातील न्यायालयाची अयतिहासिक इमारत आहे व त्याशेजारी अमेरिकेतील एकमेव सर्वात मोठा वटवृक्ष होता. तो या आगीत कसाबसा तग धरून आहे. पण, किती काळ टिकणार हा प्रश्नच आहे. मुळात तो भारतातून आणलेल्या सहा फुटी रोपट्यातून फोफावला. 1873 साली तो या परिसरात लावण्यात आला.

दोनतृतीअंश एकरात वाढलेल्या त्याची उंची साठ फूट झाली होती. त्यातून तब्बल 46 पारंब्या पुन्हा जमीनीत जाऊन त्याची साठ खोडे वजा उपवृक्ष परिसरात पसरले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक छत्रीखालील सावलीत गेली वर्षानुवर्ष साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत होते. आता त्याच्या शुष्क व काळपटलेल्या फांद्या उरल्या आहेत.

लहैना पुनर्निर्माण प्राधिकरणाला लहैनाचे पूर्व स्वरूप प्राप्त करून देण्यास अनेक वर्षे लागतील. या परिसरात असंख्य दुकाने, कलादालने, संग्रहालय, रेस्टॉरन्ट्स, हॉटेल्स, टुमदार बाजार व त्याभोवतीचा हवाहवासा वाटणारा वॉक वे होता. ते सारे आगीने नष्ट केले. असंख्य लोकांना तात्पुरत्या छावण्यात हलविण्यात आले.

हवामान बदलाव्यतिरिक्त आग लागण्याचे कारण लहैना भोवतीचा वर्षानुवर्षे कोरडा होणारा परिसर होय. त्यावर आधी शेती होत असे. परंतु, शहरीकरणामुळे शेती संपुष्टात आली. त्याजागी गवत वाढू लागले. उन्हाळ्यात ते अत्यंत कोरडे पडू लागले. त्यावर तळपत्या सूर्याच्या उन्हाने आग लागली व `डोरा’च्या झंझावताने ती क्षणार्धात पसरली.

आगीचे लोळ व जळणाऱ्या वास्तूंच्या धुराचे लोटचे लोट दोन दिवस दिसत होते. त्यात काहींचा गुदमरून, तर त्यापासून वाचण्यासाठी अनेकांनी समुद्रात उड्या टाकल्याने मरण आले. 80 टक्के आग आटोक्यात आली असली, तरी अद्याप सहा ठिकाणची आग आटोक्यात यायची आहे. हवाईचे गव्हर्नर जोश ग्रीन यांच्या मते, ``हवाईच्या इतिहासातील हे सर्वात मोठे नैसर्गिक संकट होय.’’ अध्यक्ष जो बायडन यांनीही ``सरकार सर्व मदतीसाठी सज्ज असून, सतत हवाईच्या गव्हर्नरच्या संपर्कात आहे,’’ असे म्हटले आहे.

भारतात हिमालयातील भूस्खलनाने झालेल्या अपघाताच्या असंख्य घटना आहेत. तसेच, महाराष्ट्र व इतर राज्यातील ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे टेकड्यांच्या स्खलनाने गावंच्या गावं उद्वस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

कधी अतिवृष्टी तर कधी ढगफुटी यामुळे नैसर्गिक संकटे येत आहेत. युरोप अमेरिकेतही अनेक जंगलांत आगींचं थैमान होत आहे, तर कधी नद्यांना येत असलेल्या पुरांमुळे शहरं पाण्याखाली जात आहेत. त्यामुळे वैय्यक्तिक हानि व्यतिरिक्त देशांची अब्जावधी डॉलर्सची संपत्ती काही क्षणातच नष्ट होत आहे.(Latest Marathi News)

`द इकॅनॉमिस्ट’ मध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, ``2018 मध्ये आलेल्या लेन या सुमुद्री वादळामुळे हवाईत प्रचंड पाऊस झाला, तर माउईत तीन ठिकाणी आगी लागल्या. पण त्यांची तीव्रता गेल्या आठवड्यातील आगी इतकी नव्हती. त्याच वर्षी कॅलिफोर्निया नजिक सेरा नेवाडा टेकड्यांच्या पायथ्याशी लागलेल्या आगीत 85 जणांना प्राण गमवावे लागले होते.’’

पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात आगीचे वणवे भडकले आहेत. त्यांचा सर्वाधिक फटका अमेरिका, कॅनडा, ग्रीस, ब्रिटिश कोलंबिया, मेक्सिको व स्पेन यांना बसला आहे. ग्रीसमधील कोर्फू, इव्हिया व ऱ्होड येथून सुमारे 30 हजार पर्यटक व स्थानीय लोकांना हलवावे लागले. तर हजारो एकर जमीन आगीखाली आली.

तापमानाने 40 डिग्री सेल्सियस (104 फॅरनहिट) पातळी गाठली. भारतीयांना एवढ्या तापमानाची संवय आहे. परंतु, एरवी थंड व अत्यंत अल्हाददायक तापमान असलेल्या अमेरिका, कॅनडा व युरोपची लाहीलाही होत आहे. तरीही पृथ्वीचे तापमान घटविणयासाठी अमेरिकेसह अनेक अन्य देश पुढे येताना दिसत नाही. त्यामुळे माउईतील दुर्दैवी घटनांसारख्या घटना घडत राहाणार, असेच दिसते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT