Father day
Father day Father day
Blog | ब्लॉग

फादर्स डेनिमित्त मनात आलेले दादा.. सासरे नव्हे, तर पिता..

सकाळ डिजिटल टीम

खूप दिवसांनी घरी एकटी असल्याने दुपारी निवांत होते. बाहेर पावसाच्या जोरदार सरी पडून गेल्या होत्या. मस्त मूड होता. वाचायला घेतलेले सुभाष डोंगरे यांचं 'नाद संवाद' पुस्तक वाचून संपवलं होतं. गरम कॉफी पित असताना आता काय करावं, असा विचार येत होता. तेवढ्यात समोर असलेलं कपाट खुणावत आहे असे वाटले. वस्तूंनाही आपल्याशी कधीतरी बोलावेसे वाटत असावे. मग कपाट आवरायला घेतले. कपाट उघडल्यावर समोर पुस्तके, मुलीची खेळणी, शालेय वस्तू, उगाचच हौस म्हणून घेतलेल्या डब्या, कानातले बांगड्या घालून ठेवलेले बॉक्स असं खूप काही काही.. पण वरच्या कप्प्यात होती वायरची पिवळ्या रंगाची पिशवी..

मी खास सासर्‍यांची आठवण म्हणून जपून ठेवलेली. ती पिशवी हातात घेतली आणि जुन्या स्मृती जाग्या झाल्या. ती पिशवी अगदी शेवटपर्यंत सासर्‍यांच्या जवळ असायची. फारस काही नसायचं त्यात.. रुमाल, सुपारी, चष्मा, थोडीफार औषधी बस.. पण फार मोठा ठेवा त्यात आहे असं त्यांना वाटायचं.. एकीकडे काम सुरू होतं पण मन मात्र थेट गेले माप ओलांडून प्रवेश केला त्या क्षणापाशी.

एकटी असताना तर आठवणींचे भांडार जास्त उघडते. माणूस कसाही असो त्याच्या मानस गृहात आठवणींच्या खजिन्याची एक तिजोरी असतेच. आज पितृदिन..खरं तर मुलीच्या आयुष्यात वयाच्या तेवीस-चोवीस वर्षापर्यंत आई-वडील हेच दैवत असतात. पण सासरी पाऊल पडताच ती माहेरची पाहुणी होते. यांचे आई- वडील आपल्याला आई-वडिलांसमानच असतात. माझ्या सासरच्यांना आम्ही दादा म्हणत असू. ते बेटावदला रहात असल्याने तेथून धुळे जवळ होते. त्यामुळे आठवड्यातून तीन- चार वेळा धुळ्याला त्यांची चक्कर होत असे. मग बाजारात नवीन काही दिसले की ते आणत.. वस्तूच काय देवसुध्दा आणत.. पितळेची देवी, गणपती, विठ्ठल मूर्ती, घंटा, निरांजन खूप जमा झाले आहे.

अनेक गोष्टी ते सांभाळून ठेवत. प्राण्यांवर वर पण अतिशय प्रेम करत. आमच्याकडे पोपट, कुत्रा, तर होतेच. पण एक माकड ही त्यांनी पाळले होते. त्यांच्या अंगाखांद्यावर सतत ते खेळत असायचं.. त्या पिल्लाला सगळं समजायचं म्हणे. दादा शेतात नेहमी घोड्यावरून जात.. माझे पती त्यांच्या खूप आठवणी नेहमी सांगतात. माझे लग्न झाले तेव्हा या गोष्टी नव्हत्या. पण दोन गायी होत्या. बैलजोडी होती. मांजरही रोज घरातच असायची. हे लिहिताना किती किती जुन्या आठवणी आठवतात. या आठवणींचं असंच असतं.. पावसाच्या जोरदार सरी जशा कोसळतात अगदी तसंच.. तेव्हाच मातीच घर, दारापुढील बेलाच झाड.. अनेक जण त्याची पाने घेउन जात. अंगणामध्ये रोज येणाऱ्या चिमण्या. त्या इतक्या चिवचिव करायच्या की त्यांच्या चिवचिवाटाने मला जाग यायची. सगळ्या वस्तू जपून ठेवायची सवय त्यांना होती.

प्रवासाची तिकिटे, सिनेमा, नाटकाची तिकिटे आठवडे बाजारात येणारी पुस्तके ते मुलांसाठी आवर्जून आणत, 'चांदोबाचा' गठ्ठा अजूनही मी ठेवला आहे. ते अतिशय सुंदर तबला वाजवत. त्यावेळी धुळ्यात किंवा आजूबाजूच्या खेड्यात अनेक ठिकाणी कीर्तन होत. त्या सर्व ठिकाणी ते तबला साथ करण्यासाठी जात असत. प्रख्यात गायक सुधीर फडके यांनाही त्यांनी साथ- संगत केली होती.

जळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय कीर्तन महोत्सवात ही त्यांनी तबला संगत केली होती. जळगावला आले की माझ्या गाण्याच्या क्लासमधे ते मुलांना साथ करत.. त्यांनी सगळ्यांवर माया केली. मला कधीच ते रागावलेले आठवत नाही. पूर्वीच्या मौफिली कशा होत. कलाकार कसे असतं.. यावर माझ्याशी ते नेहमी गप्पा मारत.. आजच्याच दिवशी नव्हे तर प्रत्येक वेळी वडिलांची आठवण तर येतेच.. पण पितृ समान असणाऱ्या सासर्‍यांच्या आठवणीही नेहमी चिंब करतात.

(लेखिका- विशाखा देशमुख, जळगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT