Same-Sex Marriage esakal
Blog | ब्लॉग

Same-Sex Marriage : नैसर्गिक उर्मीवर लेबलं लावणारे आपण कोण?

३२ देशांनी मान्यता देऊनही भारतच का आहे मागे? विचार करा...

धनश्री भावसार-बगाडे

कोणताही माणूस जन्माला आला की अन्न, वस्त्र, निवारा या जशा त्याच्या मुलभूत गरजा आहेत तशीच लैंगिक संबंध ही देखील त्याची मुलभूत गरज आहे. या गरजांप्रमाणेच माणूस समुहाने राहणारा प्राणी आहे, त्यामुळे त्याला समाजाचीही गरज आहे. समाज व्यवस्था चालण्यासाठी काही नियम आवश्यक असतात मान्य, पण त्यात माणूसकी मरत असेल तर त्यावर पुनर्विचार व्हायला नको का?

निसर्गाने नर आणि मादी असे दोन प्रकार जन्माला घातले. ते सर्वप्रकारच्या प्राण्यांमध्ये आढळून येतात, तसेच माणसातही आहेत. जीवसृष्टी चालावी, वाढावी म्हणून त्यांच्यात आकर्षण आणि पुनरुत्पादनाची उर्मीपण मुळातच दिली. मग आकर्षणाच्या या नैसर्गिक उर्मीवर योग्य, अयोग्याचे लेबलं लावणारे आपण कोण?

समाज सुरळीत चालावा, कोणावर अन्याय होऊ नये म्हणून काही नियम घातले जातात. ते आवश्यक असतात. कारण त्यामुळेच माणूस प्राणी हा इतर जनावरांपेक्षा वेगळा ठरतो. पण समाज आणि संस्कृतीच्या नावाने घातले जाणारे बंधनं नियम हे माणूसकी वर तर हावी होत नाही ना याचा विचार करायला हवा.

समलैंगिक संबंध अनैसर्गिक

आकर्षणाची उर्मी हे नैसर्गिक आहे. पण त्याला स्त्री आणि पुरुषांच्या चौकटीत बसवून त्या पलिकडच्या सर्वच गोष्टींना अनैसर्गीक ठरवण्याचा आतताईपणा आपण करतो असं नाही का वाटत? एखाद्या स्त्रीला पुरुषाविषयीच किंवा पुरुषाला स्त्रीविषयीच आकर्षण वाटावं अशी सक्ती करणं हे कृत्रिम ठरणार नाही का?

३२ देशांनी कायदेशीर मान्यता

लैंगिक आकर्षण हे केवळ पुनरुत्पादनासाठी नसून ती एक भावनिक गरज आहे. प्रत्येक जिवंत माणसातली नैसर्गिक उर्मी आहे या दृष्टीने आपण त्याकडे कधी बघणार? माणसातल्या नैसर्गिक उर्मीला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रांससह जगातल्या ३२ देशांनी मान्यता दिली आहे. मग महासत्ता होण्याचे स्वप्न बघणारा भारत मानसिकदृष्ट्या कधी विस्तारणार? हा प्रश्न सहाजिकच पडतो.

समलैंगिक संबंध गुन्हा नाही

सनातन संस्कृती, कुटुंब व्यवस्था आणि समाजमुल्याचे दाखले देणाऱ्या देशात मानवी भावनांना स्थान मिळावं अशी फिर्याद केली जात आहे. पण भारतीय कायदे संस्था फक्त स्त्री आणि पुरुष यांच्या वैवाहिक संबंधांना संमती देत असल्याने समलैंगिक संबंधांना यात स्थान देण्यास विरोध होत आहे. या नैसर्गिक उर्मीला अजून आता गुन्हा मानला जात नसला तरी त्याला कायदेशीर मान्यताही देण्यात आलेली नाही.

समलैंगिक विवाह गुन्हा नसल्याने असे विवाह भारतातही होत आहेत. पण त्यांना जोडपं म्हणून कोणतेही अधिकार मिळत नसल्याचे समोर येत आहे. कायद्यानुसार केवळ एक स्त्री आणि एक पुरुष हेच पतीपत्नी असल्याने त्या अनुषंगाने येणारे अधिकार केवळ अशाच जोडप्यांना मिळतात. दोन पुरुष किंवा दोन स्त्री जोडप्यांना हे कायदेशीर अधिकार देण्यात येत नाहीत.

कोणकोणत्या अडचणी येतात?

  • जोडपं म्हणून मान्यता नसल्याने त्यासंदर्भातले कोणतेही अधिकार नाहीत.

  • मुल दत्तक घेताना जोडपं म्हणून मान्यता नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सिंगल पॅरेंट होणं एकवेळ शक्य होतं. पण समलैंगिक जोडप्यांना मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. जोडपं म्हणून आयुष्यभर एकत्र राहताना मुलं हवं असणं ही पण एक मानवी नैसर्गिक उर्मीच आहे. पण ती भागवण्याचा अधिकारही या जोडप्यांना मिळत नाही.

  • लग्नानंतर एक जोडप्यातल्या स्त्री ला किंवा पुरुषाला मिळणारे कोणतेही अधिकार या जोडप्यांना मिळत नाही.

  • विवाहानंतर होणाऱ्या छळासाठी स्त्री-पुरुषांचं जोडपं कायदेशीर दाद मागू शकतं. पण समलैंगिक जोडप्यांना इथे वाव नाही.

  • समलैंगिक विवाहच कायदेशीर नसल्याने त्यामुळे मिळणारे वारसाचे कायदेशीर अधिकार किंवा घटस्फोटानंतर मिळणारे हक्क या कशाचीच दाद मागण्याची सोय या जोडप्यांना नाही.

शिवाय या संबंधांना, विवाहाला कायद्याचा कोणताच आधार नसल्याने समाजाकडूनही बराच त्रास या जोडप्यांना सहन करावा लागतो.

  • लोकांची टोमणी

  • हीन वर्तणुक

  • वाईट नजरा

  • केवळ LGBTQ समाजातील असल्याने नाकारले जाणे, अशा एक ना अनेक समस्यांना रोज ही जोडपी तोंड देत असतात.

समाजातील या द्वेष भावनेला घाबरून अनेक जण मानसिक कुचंबणेत जीवन कंठत असतात. पण देशाचे नागरिक म्हणून त्यांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, हे आपण मान्य करतो का हा मूळ प्रश्न आहे. ज्या संस्कृतिचे दाखले देत आपण या संबंधांना विरोध करत आहोत ती संस्कृतीच पहिले माणसाला माणूस म्हणून स्वीकारायला शिकवते हे आपण विसरलो आहोत. कोणी कोणासोबत जगावं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आणि माणूस म्हणून जगण्याचे हक्क आपण नाकारू शकत नाही.

कायदेशीर मान्यतेचे सामाजिक फायदे

  • जर समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली तर सर्वात मोठा फायदा म्हणजे माणूस म्हणून मोकळा श्वास घेण्याचे स्वातंत्र्य या जोडप्यांना मिळेल.

  • समाजात सन्मानाचे स्थान मिळाल्याने होणारी मानसिक कुचंबणा थांबेल.

  • सकारात्मक समाज घडू शकेल.

  • कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी मोठा आधार मिळेल.

  • लिंग भेद नाहीसा होऊन समानता वाढीस लागेल.

  • मानवी भावनांना पुरस्कृत केल्याची जाणीव वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT