Story Of Humanity In Covid Time... By Sandeep Prabhakar Kulkarni  
Blog | ब्लॉग

मैने सोचा ना था..

संदीप प्रभाकर कुलकर्णी

सुनील कंपनीत रजा टाकून सकाळी सकाळी तलाठ्याला भेटण्यासाठी गावाकडे आला होता. वडिलांनी कमावून ठेवलेल्या जमिनीच्या तुकड्याची महत्त्वाची कागदपत्रे सुनीलला हवी होती. तलाठ्याने दिलेल्या वेळेनुसार गावी आलेल्या सुनीलची नजर रस्त्याकडे लागली होती. साधारण तासाभराने साहेब आले. साहेब वडिलांना ओळखत असल्यामुळे लागणारी कागदपत्रे मिळविण्यासाठीही फारसा त्रास झाला नाही. ‘‘हे बघ सुनील, काका म्हणजे देवमाणूस... त्यामुळे जमिनीबाबत तू जो काही विचार करतोय, त्यावर पुन्हा एकदा विचार कर. तिकडं औरंगाबादला घर असणंही गरजेचं आहे म्हणा... बघ, शांततेनं घे...’’ असे म्हणून त्यांनी सुनीलला वाटे लावले. 
 
डिसेंबर २०१९ मध्ये सुनीलच्या पाहण्यात गृहप्रकल्पाची एक जाहिरात आली होती. भाड्याच्या घरात राहणारं हे कुटुंब तसं सुखी असलं तरी समाधानी मात्र नव्हतं. त्याला कारण होतं  स्वतःच्या मालकीचं घर. आणखी किती वर्षे अशी भाड्याच्या घरात काढायची, हा विचार सुनीलला स्वस्थ बसू देत नव्हता. स्वतःचं घर घ्यायचं, हा निर्णय मनाशी पक्का करून तो आणि त्याची बायको दोघंही प्रयत्न करीत होती. इरफान भाईंनी शहराला लागून असलेल्या भागात वन आणि टू बीएचके फ्लॅटचा सुरू केलेला एक मोठा प्रकल्प एव्हाना मध्यावर आला होता. गावाकडची जमीन विकून थोडीफार अॅडजेस्टमेंट होऊ शकते. स्वतःकडील बचत आणि बँकेचे कर्ज हे सगळं जुळून आलं तर पुढील वर्षी २०२० मध्ये गुढीपाडव्याला आपण स्वतःच्या घरात राहायला जाऊ, हा सगळा ‘ख्याली पुलाव’ त्याच्या मनात पक्का झाला होता. इकडे औरंगाबादला बिल्डर इरफान भाईंशी प्राथमिक बोलणीही झाली. साईट पाहून घरी आल्यानंतर हातात एक वही-पेन आणि समोर मोबाईल घेऊन सुनीलने सगळी आकडेमोड केली. गणित जुळत होतं. 
 
वर्ष २०२० मध्ये आपण नक्कीच स्वतःच्या घरात राहायला जाऊ, या आनंदात दोघे पती-पत्नी खूश होते. जवळचे काही मित्र आणि नातेवाइकांनाही साईट आवडली होती. गावाकडच्या जमिनीचं पेमेंट एकदा आलं की, सगळी कामं मार्गी लागतील, अशी खात्री होती. पण भिंतीवरील नवीन कॅलेंडरची पाने जसजशी उलटू लागली, तसतशी परिस्थिती अनुकूल होण्याऐवजी बिकट होऊ लागली. सुरवातीला पेपरात येणाऱ्या चीनमधील कोरोना उद्रेकाच्या बातम्या, तिथले फोटो, व्हिडिओ व्हॉट्‍सॲपवरून येत होते. चीनमध्ये आहे, आपल्याला काही भीती नाही, अशी भावना होती. पण ती खोटी ठरली. आधी फक्त काही दिवसांचा जनता कर्फ्यू, मग ‘घरमेंही रहो’ आणि नंतर तब्बल दोन-अडीच महिने सगळेच व्यवहार ठप्प. कोरोनामुळे अनेकांची स्वप्ने एकतर जागीच थांबली किंवा काळाच्या ओघात विरून गेली. सुनील - त्याचं कुटुंब, त्याचे नातलग-मित्र, इरफानभाई आणि त्यांच्यासारखे अनेक उद्योजक, व्यावसायिक... सगळेच आता दोन-अडीच महिन्यांनंतर हतबल झाले होते. 
 
गावाकडच्या जमिनीबद्दल तिथल्या एका वजनदार साहेबांशी सुनीलचं बोलणंही झालं होतं, पण आता त्यांनीही माघार घेतली होती. पुढंही जाता येईना आणि मागंही हलता येईना, अशा एका टकमक टोकावर सुनील सध्या उभा होता. सुनीलची आणि इरफान भाईंची भेट होऊन साधारण दोन-अडीच महिन्यांचा काळ लोटला होता. गेल्या काही दिवसांत त्यांचा फोनही नॉट रिचेबल होता. ओळखीतले लोकही अधूनमधून रिकामे सल्ले देत होते; पण सुनीलचा मात्र स्वतःच्या मनावर विश्‍वास होता. रस्त्याच्या कडेला गाडी लावून असाच विचारात असताना इरफान भाईंचा फोन आला. ‘सुनीलभाई, मै आॅफिसमें हूँ. आप आ जाओ.’ आॅफिसात जात असताना सुनीलच्या मनात विचार होता, आपल्या पैशांचं काय होईल... स्वतःच्या घराचं स्वप्न तर केवळ स्वप्नच राहतं की काय... 
  
इरफान भाईंच्या ऑफिसात केबिनबाहेर सुनील बसला होता. केबिनमध्ये फोनवर बोलत असताना इरफान भाईंचा ‘टोन’ रागात जाणवत होता. त्यांनी सुनीलला आत बोलावलं. सुनीलनं दिलेल्या रकमेची पावती फाईलमधून बाहेर काढली. टोकन अमाउंटच्या पैशांबद्दल बोलणं सुरू असताना सुनीलच्या मनात चलबिचल होत होती. त्यानंतर इरफान भाईंनी जो काही रिस्पॉन्स दिला तो ‘मैने सोचा न था’ असा काहीसा होता. ‘देखो सुनीलभाई, दरअसल कोरोना के इस दौरमें सिर्फ आप अकेले ही मुसीबतमें हो ऐसी कोई बात नहीं. हम जैसे लोग भी मुसीबतोंसे गुजर रहे है. मुश्‍किलोंका मुकाबला कर रहे है. अब मसला बचता है आपके पैसोंका. आप चाहते है, तो मैं आपका पैसा अभी ट्रान्सफर कर सकता हूँ. पर मै ऐसा करूंगा नही. एक बात को सोचो, यह जो आप प्रॉपर्टी ले रहे हो, उसमे आपका सिर्फ पैसाही नही बल्कि सपनेंभी जुड चुके है. आपकी भी कुछ ख्वाईशें है. पैसा तो अभी दे दुँगा, लेकिन एक मेरा एक मशवरा है. देखो ये जो वक्त है, वो एक जगह पर ठहरता नहीं. ये हालात भी कुछ दिनोंमे, कुछ महिनोंमे बदल जायेंगे. मार्केट भी धीरे धीरे संभल जायेगा. आपका पैसा हमारे यहाँ महफूज है. बात कुछ महिनों की तो है, आप अपनी कोशिशें जारी रखीये. आपकी प्रॉपर्टी आपकोही मिलेगी. आखिर इन्सान ही इन्सान के काम आता है. देखीये, भरोसा बहोत बडी बात है...’ इरफान भाईंनी सुनीलला दिलासा दिला. 
 
नवीन वर्ष २०२० लागले तेव्हा आपणा सर्वांच्याच मनात काही आशा-आकांक्षा होत्या. आपली काही अपुरी स्वप्ने या वर्षात नक्कीच पूर्ण होतील, असेही वाटत होते. पण झाले काय, ज्या गोष्टींचा कधी विचारही केला नव्हता, असे काही प्रकार आपल्या वाट्याला आले. हवेतील प्रदूषण थांबले होते तरीही तोंडावर मास्क चढलेला होता. आपले हात आधीचेच स्वच्छ होते, तरीही थोड्या थोड्या वेळाने ते हँडवॉशने धुवावे लागत होते. सॅनिटायझरची छोटी बॉटल प्रत्येकाजवळ आलेली होती. रस्त्यावर धूळ नव्हती; तरी बाहेरून घरी आल्यावर अंघोळ करावी लागत होती. असे बरेचसे प्रकार आपण सगळेच आता करीत आहोत. कोरोनाने सुख-समाधानाची प्राथमिकता शिकवली. माणसातल्या माणुसकीला जागवलं. भविष्यात काय होईल, याचा अंदाज कुणीही लावू शकत नाही, हेच खरे. त्यामुळे भविष्याची चिंता करीत बसण्यापेक्षा आपला ‘आज’ आपण आनंदात घालवायला हवा. भविष्यकाळ सुधारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. एक छानशी लाईन अशीच वाचली होती ती अशी - 
Learn From Your PAST, 
Believe In Your TODAY 
And Be Optimistic For Your TOMORROW. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

SCROLL FOR NEXT