ratnprabha.jpg 
Citizen Journalism

जीवनात स्वयंशिस्त महत्त्वाची 

------ रत्नप्रभा भदे, सूस रस्ता, पाषाण


---- 

जीवन अनेक टप्प्यांवरचे, हसून-रुसून जगायचे। 
मौजमजा अनुभवायचे, निवांत असे जगायचे।। 

आयुष्याच्या विविध टप्प्यांवर विविध अनुभव येत असतात. काही प्रसंग हसवतात, तर काही रडवतात. सुखे सर्वत्र दिसतात आणि हळुवार दुःखे एकामागून एक जीवनात प्रवेशतात. तेव्हा अनुभव हा गुरू प्रत्येक व्यक्तीला जीवनातील सुलभ मार्ग दाखवून मार्गस्थ करतो. दुःखद समयी मात्र लोकांकडून कधी खरी, तर कधी खोटी सहानुभूती मिळते. त्यामुळे कधी आशा तर कधी निराशा पदरी येते. दुःखातही युक्तीने मार्ग निघतात. 
अनेकदा तरुण पिढीला समजून घेण्यात खूप अडचणी येतात. याला कारण म्हणजे दोन पिढ्यांतील अंतर. यात एकमेकांना समजून घेत नसल्यामुळे जीवनात एकमेकांपासून दूर राहावेसे वाटते. आपल्या जीवनाला अर्थच नाही, या काटेरी जीवनात कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच असल्याचे निदर्शनास येते आणि गैरसमजाने दोन व्यक्तींमध्ये भांडण लागते. मध्यस्थी करण्यासाठी काही लोक मदतही करतात, तर काही फक्त बघ्याची भूमिका घेऊन मजा बघतात. तेव्हा वाईट प्रसंगातून सोडविण्यास गेलेल्या सज्जन व्यक्तीची मात्र फार त्रेधातिरपीट होते. सज्जनांचा चांगुलपणा कधी कधी नडतोसुद्धा. 
समाजातील अनेकांचा असा समज असतो, की मीच या जगात खूप शहाणा, माझ्यासारखा दुजा नाही. येथे असा विचार मनात येतो, की "जो तो म्हणे शहाणा, पर किडका जणू दाणा.' अशा वागण्याने पिढ्यान्‌ पिढ्या उद्‌ध्वस्त होतात. घरसंसार विस्कटला जातो आणि तोपर्यंत वृद्धत्व येते. "जमले तर ठीक, नाहीतर सारेच विक'. त्यासाठी आपल्या जीवनात स्वयंशिस्त असायलाच पाहिजे. त्यामुळे सर्वांना समजून घेणे शक्‍य होते. आयुष्याची सायंकाळही आल्हाददायक बनून जाते. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women’s World Cup Final : जगात भारी, आपल्या पोरी! शफाली वर्माने मोडला सेहवागचा २२ वर्षांपूर्वीचा विक्रम, दीप्ती शर्माचा विश्वविक्रम

Minister Chandrashekhar Bawankule: अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुतोवाच

मोठी बातमी! बसचा भीषण अपघात, देवदर्शनावरून परतताना ट्रकला धडक, १८ भाविकांचा मृत्यू

IND vs AUS: कुलदीप यादवला भारताच्या T20 संघातून अचानक केलं बाहेर, BCCI ने सांगितलं कारण

दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्याकडे टिकल्या उडवायची बंदुक! बंदुक, कोयता घेऊन दोघे शिरले ज्वेलर्स दुकानात, पण एक दागिनाही न घेता ३० सेकंदात झाले पसार, वाचा...

SCROLL FOR NEXT