bharti-pawar.jpg
bharti-pawar.jpg 
Citizen Journalism

माझ्या स्मृतितील भारतीताई

- डॉ. बाबा आढाव

'भारतीताई पवार यांचं निधन झालंय.'`9 मेला फोन वर मिळालेल्या या बातमीने मी आणि माझी पत्नी शीला व्यथित झालो. त्यांच्या कन्येनंच ही दुःख वार्ता आम्हाला सांगितली होती. 


अगदी अलीकडे म्हणजे गेल्या वर्षीच्या दिवाळीतच आम्ही भारतीताईंच्या सहवासात एक दिवस घालवला होता. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर आम्ही भेटलो होतो. त्यामुळे साहजिकच जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला होता. भारतीताईंचा स्वभाव मिष्किल, खोडकर त्यातच नव्वदीच्या जवळ पोहचत असतानाही त्यांची स्मरणशक्ती अत्यंत तल्लख. माझ्या पत्नीसमोरच त्यांनी माझ्या मित्र-मैत्रिणींच्या आठवणी काढून मला चकीत केलं होतं. आणि त्यावर 'आठवतं का?' म्हणून माझीच साक्ष काढली होती. तो दिवस त्यांच्या त्या जुन्या आठवणीनं आमच्यासाठी मखमली दिवस ठरला. 
भारतीताईंच्या जन्म खानदेशातील नंदूरबारचा. शालेय जीवनापासूनच त्यांनी स्वांतंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता. स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये स्वातंत्र्यसेनानी लक्ष्मणराव पवार यांच्याशी भारतीताईंचा विवाह झाला. लक्ष्मणराव आणि भारतीताई यांच्या वाल्हे येथे 'गांधी पद्धती'नं झालेल्या विवाहास विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते. वाल्हे गावाच्या पंचक्रोशीतील प्रचंड जनसमुदाय हा विवाह पाहण्यास लोटला होता. 

हडपसर येथील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय क्षेत्रात प्रबोधनासाठी कार्य करणाऱ्या मंडळीसाठी भारतीताई पवारांचं घर हे 'माहेर' होतं, हक्काचं घर होतं. भारतीताईंच्या हातची खानदेशी खिचडी, कढी, भरली वांगी ज्यांनी चाखली आहेत, तो भारतीताईंना विसरणं शक्‍यच नाही. आपल्या पतीप्रमाणेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून भारतीताईंनी सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला. ग्रामीण विकास, सहकारी तत्त्वांवर संस्थांची निर्मिती करणं, त्यांचा विकास करणं, सहकारी पद्धतीनं शेतीचा प्रयोग राबवणं यात त्यांनी लक्ष्मणरावांना अत्यंत मनापासून साथ दिली. त्या स्वतः खंबीर, बेडर तर होत्याच. पण या क्षेत्रात कुठल्याही संकटांचा सामना करण्यासाठी त्या मानसिकदृष्ट्या कणखर होत्या.
 

मांजरी बुद्रूक येथील सहकारी शेती, हडपसर भाजीपाला मार्केट, साने गुरुजी रुग्णालय, साधना हायस्कूल, जयप्रकाश गो-ऑप. हाऊसिंग सोसायटी अशा संस्थांच्या उभारणीत पतीबरोबरच त्यांचाही वाटा अनमोल आहे. हडपसर आणि आसपासच्या परिसरातील महिलांना एकत्रित आणून त्यांनी 'शारदा महिला मंडळा'ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजपयोगी उपक्रम राबवले. भारतीताई या आधुनिक आणि पुरोगामी विचारसरणीच्या. त्यांनी आपल्या तत्त्वांशी कधीच तडजोड केली नाही. आपल्या मतांशी त्या ठाम असतं. त्यांना एक मुलाग आणि चार मुली. पण ग्रामीण भागात राहूनही सबोवतालचं वातावरण परंपरावादी असूनही त्यांनी मुलाग, मुलगी असा भेदभाव कधीच केला नाही. आपल्या मुलांना उच्चाशिक्षित करुन त्यांना आपल्या पायावर उभं केलं. त्यांच्यावर पुरोगामी विचारांचेच संस्कार केले. 

अशा या आदर्श माता, उत्तम गृहिणी, सामाजिक भान असणाऱ्या क्रियाशील कार्यकर्त्या, मनस्वी स्वभावाच्या, स्वातंत्र्यसेनानी भारतीताई पवार या समृद्ध जीवन जगल्या. आपल्या जीवनास त्यांनी सार्थ केलं. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT