coronavirus work from home sakal media initiative social media campaign by Reena Agrawal
coronavirus work from home sakal media initiative social media campaign by Reena Agrawal 
कोरोना

#AtHomeWithSakal 'सकाळ'तर्फे रीना अग्रवाल शिकवतेय ड्रेसचं फ्युजन!

सकाळ वृत्तसेवा

पुणे Coronavirus : कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगापुढं आव्हान उभं केलं आहे. आपणही या कोरोनाचा मोठ्या धैर्यानं सामना करत आहोत. व्हायरसचा फैलाव होऊ नये म्हणून, आपल्याला घरीच बसावं लागतंय. तुम्हीही घरीच असाल पण, घरात बसून तुम्हाला कंटाळा आला असेल तर, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. सकाळ माध्यम समुह तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज घेऊन आलाय. यासाठी तुम्हाला सकाळचे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करावं लागणार आहे. तुमच्या कुटुंबातील प्रत्येकासाठी इथे काही ना काही सरप्राईज आहे... चला तर मग मजा करू.. 

पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची घोषणा केली होती. पण, आता राज्य सरकारनं जमावबंदी आदेश लागू केल्यामुळं आता सगळ्यांनाच घरी थांबावं लागणार आहे. वैद्यकीय सेवेतील व्यक्ती, पोलिस, पत्रकार हेच प्रामुख्यानं बाहेर पडतील. आता घरी बसून काय करायचं? अशी समस्या तुमच्या समोर असेल तर, सकाळ माध्यम समुह तुमच्या सोबत आहे. यात महिलांपासून बच्चे कंपनीपर्यंत सर्वांसाठी सर्वकाही देण्यात येणार आहे. आज महिलांसाठी विशेष म्हणजे अभिनेत्री रिना अग्रवाल शिकवणार आहे ड्रेसचं फ्यूजन... बघा आणि असंच करून आम्हाला व्हिडिओ पाठवा, आमच्या कोणत्याही सोशल मीडिया हँडलवर... उत्कृष्ट स्पर्धकाला मिळेल धमाल बक्षीस... 

विशेष म्हणजे, आपले मराठी सेलिब्रेटीदेखील यात सहभागी झाले आहेत. सोनाली कुलकर्णी, स्मिता गोंदकर, मानसी नाईक, उर्मिला कानेटकर, रिना अगरवाल, मृण्मयी कोलवलकर, रेशम टीपणीस, स्पृहा जोशी, सई ताम्हणकर, पूजा सावंत आणि अमृता खानवीलकर यात सहभागी होणार आहेत. येत्या काही दिवसांत तुम्हाला आणखी घरात बसावं लागण्याचाही शक्यता आहे. त्यामुळं एकच करा, सकाळ माध्यम समूहाला फेसबुक, ट्विटर, इन्सटाग्राम या सगळ्या प्लॅटफॉर्मवर फॉलो करा.

Twitter - @SakalMediaNews
Facebook - @SakalNews
Instagram - sakalmedia
TikTok - @sakalmedia

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला MI चा माजी कप्तान

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT