DHULE CRIME  SAKAL
Crime | गुन्हा

Crime News : दारूच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या

Crime News : आपल्या शेतातील घरात दाम्पत्य राहायचं.

सकाळ डिजिटल टीम

Crime News : पती पत्नीच्या किरकाेळ वादाचे रूपांतर पतीकडून पत्नीची हत्या करण्यात झाले असल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

अधिक माहिती अशी कि, घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील मोहिदा येथे घडली. नंदा पावरा व बाळू पावरा हे दांपत्य या ठिकाणी वास्तव्यास आहे. आपल्या शेतातील घरात हे दाम्पत्य राहायचं.

या दोघांमध्ये रात्री वाद झाला. या वादावेळी पती बाळू याने दारुच्या नशेत पत्नी नंदा हिच्या डोक्यात लाकडी दांडके मारले.यावेळी जबर मारहाण झाल्याने पत्नी नंदा (वय 30) हिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोतवाल म्हणून काम करत असलेला मारेकरी पती बाळू पावरा (वय 40) यास पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. नंदा पावरा यांचा मृतदेह पोलिसांनी तपासणीसाठी पाठविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT