Drugs Case
Drugs Case esakal
Crime | गुन्हा

Drugs Case : मालेगावात परत सापडला “कुत्ता गोळी”चा साठा! मेडिकलमध्ये बिनबोभाट सुरू होती विक्री

सकाळ डिजिटल टीम

Drugs Case : सध्या ड्रग्सचं प्रमाण वाढलं आहे, आपण सध्या अनेक सिरिजमध्ये बघतो की लोकं कोणत्यातरी प्रकारच्या ड्रग्सच्या गोळ्या घेत असतात. तरुण वय म्हटलं की मुलांना खूप वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करून बघायच्या असतात, या सगळ्याच्या नादात मुलं अनेक ड्रग्सच्याा आहारी जातात.थ्रिल वाटतं म्हणून अनेक मुलं दारूच्या आहारी जातात पण दारू प्रत्येकाच्या खिशाला परवडते असं नाही. अशात ड्रग्सच्या बाजारात एक अशी गोळी काढली आहे जी खूप भयानक ट्रिप देते.

कुत्ता गोळी

दारू महागल्यामुळे नाशिक शहराच्या मालेगावमध्ये ही गोळी अवैधरित्या विकली जाते आहे. विशेष म्हणजे मेडिकल मध्ये सर्रासपणे ही गोळी मिळते आहे. ग्रामीण पोलीसांनी नववर्षात तीन गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळे तरुणाईमधील कुत्ता गोळीची झिंग काही कमी झालेली दिसून येत नाही.

कुत्ता गोळीची झिंग

मानसिक आजार व झोप ने येणे या रुग्नांसाठी अल्प्रालोझम ही गोळी डॉक्टरांच्या सल्ल्यानं अल्प प्रमाणात देण्यात येते. मात्र या गोळीचा वापर नशेसाठी वापर होत असल्याचं याआधीही अनेकदा समोर आलं आहे.कुत्ता गोळी हा एक नशेचा स्वस्त प्रकार आहे. आपण काय करतोय, याचं भानही या गुन्हेगारांना नशेच्या भरात राहत नाही. कुत्ता गोळी नावाने संबोधल्या जाणाऱ्या या ड्रग्जच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम शरीरावरही वेगवेगळ्या पद्धतीनं दिसून येतात

मालेगाव शहरात कुत्ता गोळी सर्रासपणे विक्री केली जात असल्याचे यापूर्वीच्या कारवाईवरुन स्पष्ट झाले होते. पोलीसांच्या कारवाईनंतरही वारंवार कुत्ता गोळीची विक्री केली जात असल्याचे दिसून आले आहे. एक ते दोन रुपयांना मिळणारी गोळी दारूच्या तुलनेत स्वस्त आहे. त्यामुळे तरुणाई ही गोळी खरेदी करून नशा करत असल्याचे लक्षात आल्याने मुस्लिम संघटना आणि पोलीस दलाने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

मागील आठवड्यात मालेगाव शहरात न्यू मदनीनगर भागात अवैधरित्या कुत्ता गोळी विक्री करणाऱ्या रईस शहार उर्फ शहा याच्यावर छापा टाकला होता. रईसची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे 10 हजार रुपयांहून जास्त किमतीच्या कुत्ता गोळीच्या स्ट्रिप्स आढळून आल्या आहे, त्या ग्रामीण पोलीसांनी जप्त केल्या आहे.

मालेगावमध्ये तीन ठिकाणी कुत्ता गोळीच्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून केलेल्या कारवाई वरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तरुणाई कुत्ता गोळीच्या नशेच्या आहारी जात असल्याचे लक्षात आल्याने मुस्लिम संघटना आणि पोलीस दलाने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT