Missing little girl  Esakal
Crime | गुन्हा

मुलगी क्रमांक 166: हरवलेली लहानशी मुलगी तब्बल 9 वर्षानंतर तिच्या घरच्यांना सापडली..

पूजा बेपत्ता होऊन दोन वर्षे उलटून गेली होती आणि तिच्या कुटुंबीयांनीही आता आपल्या आपली मुलगी भेटेल ही आशा सोडली होती.पण एका पोलिसाने आशा सोडली नव्हती.

सकाळ डिजिटल टीम

22 जानेवारी 2013 रोजी सकाळचे सुमारे 8:15 वाजले होते. निळ्या रंगाचा स्कर्ट घातलेली 7 वर्षांची मुलगी तिच्या भावासोबत शाळेत जात होती. भावाच्या खिशात असलेल्या पैशावरून भाऊ-बहिणीत भांडण झाले. शाळा सुटल्यानंतर भाऊ घरी बहिणीसाठी न थांबताच एकटाच घरी परतला पण मुलगी घरीच आली नाही. पूजा गौड असे या मुलीचे नाव आहे. नातेवाइकांनी पोलिसांच्या मदतीने अनेक वर्षे या मुलीचा शोध घेतला मात्र तिचा काहीही पत्ताच लागला नव्हता. आता तब्बल 9 वर्षांनंतर एका निवृत्त पोलिसाला पूजा सापडली आहे.

मुलगी क्रमांक 166..

आपली मुलगी पूजा ही शाळेतून घरी न पोहोचल्याने तिच्या कुटुंबीयांनी दादाभाई नौरोजी (डीएन) नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र भोंसले यांनी ही कारवाई केली. पोलिसांकडे असलेल्या बेपत्ता मुलींच्या रेकॉर्डमध्ये पूजाचे नाव हे 166 व्या क्रमांकावर आहे आणि त्यामुळे तिला मुलगी क्रमांक 166 म्हटले जाऊ लागले. द इंडियन एक्सप्रेसमधील एका लेखानुसार, 2008 ते 2015 दरम्यान, डीएन नगर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत परिसरातून 166 मुली बेपत्ता झाल्या होत्या. मे 2015 पर्यंत 165 मुलींचा शोध लागला होता, परंतु पूजा सापडली नाही.

बेपत्ता ब्युरोचे प्रभारी अधिकारी राजेंद्र भोसले मे 2015 मध्ये निवृत्त झाले. पूजा बेपत्ता होऊन दोन वर्षे उलटून गेली होती आणि तिच्या कुटुंबीयांनीही आता आपल्या आपली मुलगी भेटेल ही आशा सोडली होती.पण एका पोलिसाने आशा सोडली नव्हती. उपनिरीक्षक भोंसले हे नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते पण त्यांच्या मनात पूजा सापडत नसल्याची खंत कायम होती. ते कुठेही बाहेर गेले की पूजाचा फोटो नेहमी त्याच्यासोबत असायचा आणि ते त्या फोटोच्या दोन प्रती आणि अनेक पासपोर्ट साइज फोटो तो स्वतंत्रपणे आपल्याजवळ ठेवायचे जेणेकरून गरज पडल्यास कुठेतरी देऊ शकेल. उपनिरीक्षक भोसले यांनी पूजाला शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले. ती जिवंत आहे आणि एक दिवस ती नक्कीच मिळेल याची त्यांना खात्री होती. त्याच्या काही सहकाऱ्यांनी सांगितले असे सांगितले की, कि भोसले हे पूजाचा पोटच्या लेकीप्रमाणे शोध घेत होते .

भोंसले सेवानिवृत्तीनंतर गावी गेले, पण जेव्हा ते मुंबईत यायचे तेव्हा त्यांना पूजा शोधायचा प्रयत्न करायचे.भोंसले हे शेकडो वेळा पूजा बेपत्ता झालेल्या ठिकाणी गेले होते.तक्रार नोंदवलेल्या डीएन नगर पोलीस स्टेशनमधील प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला माहीत होते की भोंसले पूजाचा शोध घेत आहे.

9 वर्षांनी पूजा कशी सापडली ?

ही गोष्ट कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही आहे .पण या गोष्टी धक्का याचा बसतो की ही 9 वर्ष बेपत्ता असलेली पूजा तिच्या घरापासून फक्त 500 मीटर अंतरावर सापडली.

कोणी केले होते पूजाचे अपहरण..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा आणि तिचा भाऊ रोहित या दोघांमध्ये पॉकेटमनीवरून भांडण झाले होते. रोहित पूजाच्या थोडा पुढे गेला पण आणि पूजाला मागच्या मागुनच हॅरी डिसूझाने तिला कुल्फीचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. हॅरी डिसूझा आणि त्यांची पत्नी सोनी डिसूझा यांना मूल नसल्यामुळे पूजाला जबरदस्ती आपल्या घरी घेऊन गेले.

दोघांनीही पूजाला नवीन नाव दिले - अॅनी. जेव्हा पूजा बेपत्ता झाल्याची बातमी पसरली तेव्हा स्थानिक लोकांनीही तिला शोधण्यात मदत करण्यास सुरुवात केली, त्यानंतर डिसूझाने तिला महाराष्ट्राबाहेर कर्नाटकात नेले आणि तिथल्या बोर्डिंग स्कूलमध्ये तिला शाळेत टाकले.

नंतर काही वर्षांनंतर डिसूझा आणि त्यांच्या पत्नीला मूल झाले मूल झाल्यानंतर त्यांचा पूजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला. त्यांनी पूजाला परत मुंबईला आणले आणि आपल्या लहान मुलाची काळजी घेण्याची जबाबदारी पूजावर टाकली. पुढे पूजाचे शिक्षण बंद करुन तिला शेजारी धुणे भांडी करायच्या कामाला लावून दिले. कामानिमित्त पूजा बाहेर गेली तेव्हा तिने एका महिलेला सांगते की डिसूझा आणि सोनी माझे खरे आईबाबा नाही आहे.ते मला खूप मारहाण करतात.

पूजाने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यानंतर, प्रमिला देवेंद्र यांनी गुगलवर सर्च केले आणि त्यांना पूजा गायब असल्याच्या अनेक फोटो त्यांना दिसुन आले. त्या फोटोत त्यांना एक पोस्टरही सापडले ज्यावर चार फोन नंबर दिलेले होते. 3 क्रमांकावर फोन केल्यावर कोणीही फोन उचलला नाही. प्रमिलाने 4 नंबरवर फोन वाजवला आणि पूजाच्या शेजारी मोहम्मद रफिकने फोन उचलला. रफिकने फोन पूजाच्या आईजवळ नेऊन दिला. पूजाला व्हिडिओ कॉलवर पाहिल्यानंतर तातडीने तिच्या आईने पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांच्या मदतीने पूजाला तिचे खरे आईबाबा घर परत मिळाले. पुढे पोलिसांनी डिसोझा आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डिसोझाला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, पण सोनीला तिच्या 6 वर्षांच्या मुलीमुळे अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: वॉशिंग्टन सुंदरची एकाकी झुंज, नाबाद अर्धशतक झळकावून वाढवली गतविजेत्यांची डोकेदुखी

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णय? पाटीदार अम्पायरकडे धावला, विराट संतापला... वॉशिंग्टनला परत बोलवल्याने राडा

SCROLL FOR NEXT