Rebirth in Vishnu Puran: सगळ्यांना खूप उत्सुकता असते की माणसाच्या मृत्यूनंतरचे चक्र नक्की कसे असेल? अर्थात हे कोणीही सांगू शकत नाही, कारण जीवंतपणी हा अनुभव घेणे अशक्य आहे.
पण आपण मागच्या जन्मात नक्की कोण होतो? आणि पुढच्या जन्मी नक्की कोण असू? ही उत्सुकता तर कधीच संपत नाही, हिंदू पुराणात असे अनेक ग्रंथ आहेत जे आपल्याला याबद्दलचा खुलासा करतात जसे की विष्णुपुराण.
असं म्हणतात, मृत्यू हा आत्म्याच्या प्रवासाचा एक टप्पा असतो, कारण शेवट हा शरीराचा असतो आत्म्याचा नाही. प्रवास हा आत्म्याचा असतो शरीराचा नाही.
आपला आत्मा एका शरीरातून दुसऱ्याच्या शरीरात जातो आणि एखाद्या आत्म्याला तेच शरीर मिळण्यामागे काही कारण असतं. आपण हे सगळं अनेकदा विष्णु पुराण, गीता आणि इतर शास्त्रांमध्ये ऐकलं आहे.
पण कोणत्याच आत्म्याचे ध्येय हे भटकणे नसते उलट त्याला मुक्ती हवी असते. आपण याला मोक्ष म्हणतो, जेव्हा आत्मा परमात्म्याशी एकरुप होतो तेव्हा मोक्ष मिळतो.
आत्मा केवळ परमात्मा प्राप्त करण्यासाठी विविध शरीरे प्राप्त करतो, पण फक्त इच्छेच्या चक्रात अडकल्याने, आत्म्याला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या जन्मात यावे लागते.
अशाप्रकारे या कथेत सांगितले आहे की, मृत्यूच्या वेळी ज्या भावनेत व्यक्ती असतो, त्याच भावनेने त्याला पुढील जन्म मिळतो.
गीतेमध्ये असेही म्हटले आहे की, ज्याचे मन मृत्यूच्या वेळी भगवंताचे नामस्मरण करत असते त्याला मोक्ष प्राप्त होतो, पण हे फार कठीण आहे कारण ज्या भावनेचा मनुष्यावर आयुष्यभर प्रभाव असतो मृत्यूच्या वेळी त्याच भावनेचे त्याच्या मनावर प्रभुत्व असते.
जड भरताची एक कथा सांगितले जाते की, तो एक महान संत राजा होता. तो धार्मिक होता आणि लोकांची काळजीही घेत असे.
पण एके दिवशी असे झाले की, नदीत तो आंघोळ करत असताना एका हरीणीने सिंहाच्या भीतीने पळत येऊन नदीत उडी मारली, पण तिला नदी पार करता आली नाही.
हरीण गर्भवती होती आणि तिने पाण्यातच तिच्या बाळाला जन्म दिला. तिने एका हरीणीला जन्म दिला आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. ते लहान पाडस पाहून राजाला दया आली आणि त्यांनी त्या हरिणीच्या पाडसाला आपल्या महालात नेले.
जडभरत राजाने त्या हरणाचे आपल्या मुलाप्रमाणे संगोपन सुरु केले. हरीणही राजावर खूप प्रेम करु लागले आणि राजासोबत खेळू लागले, जे पाहून जडभरत राजाला आनंद व्हायचा.
राजाचे हरणाच्या पाडसाबद्दलचे आकर्षण वाढतच गेले आणि हळूहळू तो म्हातारा होऊन मेला.
पण मृत्यूसमयीही त्याचा त्या हरिणीबद्दलचा मोह संपला नाही, तो तिचाच विचार करत राहिला. त्याचा परिणाम असा झाला की त्याला मनुष्य योनीतून प्राण्यांच्या योनीत जावे लागले आणि तो स्वतः त्या हरणाच्या गर्भात आला आणि त्याने पुढील जन्म हरणाच्या रुपात घेतला.
तुम्ही हेही पाहिलं असेल की, घरात कुणाच्या मृत्यूनंतर काही वर्षांत एखादं मूल जन्माला आलं तर लोक म्हणतात की, घरातील तोच सदस्य मुलाच्या रुपाने तुमच्या घरी परतला आहे. वास्तविक हे त्या व्यक्तीची त्याच्या कुटुंबाप्रती असलेलं प्रेम आणि मोह दर्शवते.
कारण माणूस आपल्या वासना आणि कुटुंबाशी असलेला मोह यातून लवकर मुक्त होऊ शकत नाही. गरुड पुराणात कर्माचे महत्त्व सांगितले आहे, त्यानुसार मनुष्य जे कर्म करतो त्याला पुढचा जन्म मिळतो. म्हणूनच कर्म आणि कामना या दोन्ही गोष्टी माणसाच्या पुढील जन्माचे कारण मानले जाते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.