Deep Amavasya esakal
संस्कृती

Gatari Amavasya: गटारी नव्हे तर 'गताहारी'

अर्धवट महितीमुळे आपणच सणांना करतो बदनाम

सकाळ डिजिटल टीम

आपल्याकडे अनेक सण-वार साजरे केले जातात. त्याचबरोबर अर्धवट महितीमुळे आपणच सणांना बदनाम करायचे काम करत असतो. आपल्याकडे आषाढी अमावस्या नंतर आहारात बदल केला जातो. या दिवसाला गताहारी(जो आहार गेला आहे ती) अमावस्या असे म्हणतात.

गटारी नव्हे तर 'गताहारी'

'गटर' हा इंग्रजी शब्द आहे. अशुध्द जलसंवहन यंत्रणेसाठीचा हा इंग्रजी शब्द म्हणून वापरला जातो. इंग्रजांच्या काळात या शब्दाशी भारताचा परिचय झाला. भारतीय सण हे नेहमीच पावित्र्याचं अधिष्ठान मानले जातात. तसेच स्थळ काल व परिस्थिती यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध आहे. आषाढ हा पूर्वी विशेष करुन मोठ्या पावसाचा काळ असायचा. पावसामुळे अंधारलेपण व अन्न उपलब्धी ही मोठी अडचण असायची.

श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी व नंतरही श्रावणात कित्येकदा उपासमारीची परिस्थिति येत असे. शिवाय पावसाळी पाण्याने रोगराई पसरण्याच्या शक्यता टाळण्यासाठी कमी खाण्याचा वैद्यकीय सल्ला धर्माचा आधार देऊन चार(चातुर्मास) महिन्यासाठी लागू केला जायचा.

उपोषण म्हणजे गताहार

गत म्हणजे गेलेला आहार म्हणजे जेवण. तर असा हा गताहार प्रारंभ आषाढी अमावस्येपासून होतो. म्हणून गताहारी अमावस्या. आपल्या प्रत्येक सणांचे नावे संस्कृतवर आधारित आहेत. Gutter हा इंग्रजी शब्द आपल्या सणाला खोडसाळ पणे जोडलेला आहे.आपल्या प्रत्येक सणाला मोठा अर्थ आहे.

गटार (Gutter) नव्हे, गताहार

गत = मागील, जुने, गेलेले, आता नाहीं ते

आहार = भोजन

गत+आहार = गताहार

या दिवशी दीप पुजन करतात

येत्या रविवारी म्हणजेच 28 जुलै रोजी दीप अमावस्या आहे. महाराष्ट्रातील सर्व घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने या दिवशी दीपपूजन केले जाते.

जुनी परंपरा असलेल्या आपल्या धर्मात याच्या मागचे विज्ञानही सामावलेले आहे. पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या पूजनापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे.

यामागची वैज्ञानिक कारणे

१) पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही.

२) बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा / प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत. मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून ? याचा साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो. त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.

३) या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.

४) वातावरणात ओलावा असतो. मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते हवेतील वाढलेल्या जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते.

५) आज विविध लसी, अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके, औषधे उपलब्ध असूनसुद्धा, धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथींना आवर घालणे कठीण झाले आहे. अनेक घातक रोगांच्या जीवघेण्या साथी, ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतुंमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो.

अशा सर्व कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेली आहे. यामुळे आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.

या दिवसात शाकाहार करण्यामागेही शास्त्रीय कारणे आहेत

१ ) अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही मिळत नाहीत.

२) शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात.

३) तुलनेने शाकाहार करणाऱ्यांचे या दिवसात नीट पचन होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT