Adhik Maas 2023 esakal
संस्कृती

Adhik Maas 2023 : अधिकमासात हे पदार्थ खाणे टाळा, नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम

येत्या १८ जुलैपासून अधिकमास सुरू होत आहे.

धनश्री भावसार-बगाडे

What Should Not Eat In Adhik Mass In Marathi : दर दोन, अडीच वर्षांनी अधिकमास येत असतो. यंदा हा अधिकमास श्रावण महिन्याला लागून येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी दोन महिन्यांचा श्रावण साजरा करण्यात येणार आहे. यंदा हा अधिकमास १८ जुलै २०२३पासून सुरू होणार आहे.

अधिकमास हा देखील श्रावणाप्रमाणे अत्यंत पवित्र महिना मानला जातो. मात्र या महिन्यात काही नियम पाळणे आवश्यक असते.

अधिकमासात कोणते पदार्थ खाऊ नये याचेही काही नियम आहेत. नाहीतर त्याचे दुष्परीणाम भोगावे लागतात असे शास्त्र सांगते.

हिंदू धर्मात अधिकमासाला विशेष महत्व आहे. याकाळात केले जाणारे निष्काम पुण्यकर्माचे फळही अधिक मिळते असे मानले जाते.

त्यामुळेच याकाळात अनुष्ठानाला विशेष महत्व आहे. त्यासाठी शुद्ध आचरण, सात्विक भोजन या गोष्टी पाळल्या जाव्यात असं शास्त्र सांगते.

हे पदार्थ टाळावे

तामसिक अन्न - अधिकमासात शक्यतो तामसी पदार्थ खाणे टाळावे. तामसिक अन्न सेवनाने एकाग्रता नष्ट होते आणि जडपणा जाणवतो.

यात कांदा, लसुण, मूग, मसूर, मोहरी, लेट्यूस, कोबी, फ्लावर, शिळे अन्न, मध या सर्वांचा तामसी पदार्थांमध्ये समावेश होतो.

मांसाहार, मद्यपान - या महिन्यात मांसाहार करू नये. यामुळे नकारात्मकता येते. त्यामुळे या महिन्यात अंड, मासे, मटन, चिकन, इतर मांसाहारी पदार्थ, आम्ली पदार्थांचे सेवन करून नये.

काय खावे?

जेवणात गहू, बेसन, चनाडाळ, तीळ, शेंगदाणे, भात, भाजी यांचा समावेश असावा. सात्विक जेवणाने मन, शरीर तंदुरूस्त राहते. संतुलन सुधारते व पचन सुधारते.

यात तुम्ही पालक, भेंडी, शिमला मिरची, काकडी, जीरे, सेंधव मीठ, लालमाठ आदींचा समावेश असावा.

पूजा

अधिकमास हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असतो. त्यामुळे याकाळात त्यांची भक्ती, पूजा, अनुष्ठान करण्यास विशेष महत्व आहे. याद्वारे विष्णूकृपा प्राप्त करून घेता येऊ शकते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonavala Traffic : लोणावळ्यात २२० वाहनांवर कारवाई; एक लाख ८२ हजारांचा दंड वसूल

MPSC: ‘एमपीएससी’त अपात्र ठरलेल्या खेळाडूंना दिलासा; छत्रपती संभाजीनगर, निवडप्रक्रियेसाठी पात्र ठरविण्याचे मॅटचे आदेश

Supriya Sule : महायुती सरकारने दिवाळखोरीकडे वाटचाल केली; खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

लवकर सुधारणा करा! मुख्यमंत्र्यांची नगर विकास खात्याच्या कामावर नाराजी, फडणवीस अन् शिंदे यांच्यात ऑल इज नॉट वेल?

Teacher Transfer: ऑनलाइन बदली प्रक्रियेत शिक्षकांची डोकेदुखी; संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरण्याची टांगती तलवार, समायोजनाचाही प्रश्न

SCROLL FOR NEXT