संस्कृती

Akshay Tritiya 2024 : अक्षय तृतीयेला धनप्राप्तीसाठी करा हे 6 सोपे उपाय, पैशांची चणचण होईल दूर

आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत जे अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते

साक्षी राऊत

Akshay Tritiya : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. अक्षय्य तृतीया हा स्वयंभू मुहूर्त मानला जातो. अक्षय्य तृतीयेचा दिवस संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे. असे मानले जाते की हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात सौभाग्य वाढवतो. या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू केले तर ते शुभ होते. या दिवशी जप, तपस्या आणि दान केल्याने उत्तम फळ मिळते.

धनसंपत्तीचा संबंध वास्तू शास्त्राची असतो. कोणत्याही मनुष्यावर त्याभोवती असलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव असतो. आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत जे अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.

1. लग्न राशीचा ‘स्वामी ग्रह’ करा प्रसन्न

प्रत्येक जातकाची एक चंद्र राशी असते आणि या प्रकारेच जन्मापासून संबंधित एक लग्न राशी असते. जातकाचे गुण आणि व्यवहारावर लग्न राशी प्रभाव टाकते. जर आपल्या कामांमध्ये अडथळे येत असतील किंवा आर्थिक रूपाने त्रस्त असाल तर आपल्या लग्न राशीच्या ‘स्वामी ग्रहा’ च्या अनुकूल रंगाची एखादी वस्तू नेहमी स्वत:जवळ असू द्या. किंवा त्या रंगाचा रुमालही जवळ ठेवू शकता.

2. घरातील आलमारी योग्य ठिकाणी ठेवा

पैसे ठेवण्याची आलमारी योग्य दिशेत ठेवायला हवी. आलमारी उत्तर दिशेच्या खोलीत दक्षिण भिंतीवर लागलेली असल्यास धन वृद्धी होते.

3. मुख्य दारावर दिवा लावा

दररोज सकाळी लक्ष्मी पूजन करायला हवे आणि सायंकाळी मुख्य दाराच्या उजवीकडे तुपाचा दिवा लावायला हवा. हे दोन्ही कार्य केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. (astrology)

4. घराच्या मुख्य दारावर गणपती

गणपतीचा फोटो किंवा मूर्ती घरातील मुख्य दारावर लावल्याने घरात धन संबंधी समस्या सुटतात. अशाने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. (Akshay tritiya)

5. घरात तुळस लावा

तुळस लावून नियमित झाडाला पाणी दिल्याने कधीच धन-धान्याची कमी भासत नाही.

6. गायीला चारा खाऊ घाला

रोज सकाळी स्नान केल्यानंतर गायीला हिरवा चारा किंवा कणीक किंवा पोळी खाऊ घालावी. याने लक्ष्मी प्रसन्न होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT