Akshaya Tritiya 2023
Akshaya Tritiya 2023 esakal
संस्कृती

Akshaya Tritiya 2023 : अक्षय तृतीयेला सोन्याऐवजी राशीनुसार खरेदी करा हे धातू, होईल धनवर्षाव

सकाळ डिजिटल टीम

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला आता काहीच तास उरले असून या दिवशी बहुतांश लोक सोने खरेदी करतात. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.

या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करून त्यांची आराधना केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र ज्योतिष शास्त्रात असे सांगितल्या गेलेय की जर तुम्ही सोने खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या राशीनुसार इतर धातूही खरेदी करू शकता. चला जाणून घेऊया अक्षय्य तृतीयेला कोणत्या राशीचे लोक कोणते धातू खरेदी करू शकतात.

राशीनुसार विकत घ्या हे धातू

मिथुन आणि कन्या राशी - या राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेला ब्राँझचे दागिने खरेदी करावेत. यामध्ये ताट, लोटा अशी भांडी असू शकतात. हे धातू खरेदी केल्याने तुमच्या व्यवसायात वाढ होईल.

मकर राशी - या राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याऐवजी स्टीलची भांडी किंवा लोखंडाची वस्तू खरेदी करावी. याने तुम्हाला भगवंताचा आशीर्वादही मिळेल आणि तुमचा मानसिक त्रासही कमी होईल.

वृषभ आणि कर्क : या दोन राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ राहील. असे केल्याने त्यांना कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता वाढेल.

धनु आणि मीन : या राशीचे लोक अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने आणि पितळेच्या वस्तू खरेदी करू शकतात. सोनं आणि पितळ खरेदी केल्याने तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.

वृश्चिक : या राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेला सोन्याऐवजी तांब्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी करणे चांगले राहील. असे केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. (Astrology)

मेष आणि सिंह : अक्षय तृतीया 2023 रोजी या दोन राशीच्या लोकांनी सोने आणि तांबे खरेदी करावेत. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल, ज्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतील.

डिस्क्लेमर - वरील लेख ज्योतिषशास्त्रातील माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT