Ashadi Wari 2023 sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यात, आयुर्वेद जनजागृती अभियान; ‘वेदनामुक्त वारी’

नमस्कार फाउंडेशन व तात्या बापट समितीचे आयोजन, आयुर्वेद जनजागृती अभियान

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यात आयुर्वेद जनजागृती अभियाना अंतर्गत ‘वेदनामुक्त वारी’चे आयोजन निगडी-प्राधिकरण यथील नमस्कार फाउंडेशन व तात्या बापट समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सासवड ते पंढरपूर दरम्यान करण्यात आले आहे. पायी चालून थकलेल्या वारकऱ्यांना आयुर्वेदिक तेलाच्या मसाजद्वारे वारकरी चरण सेवा देण्यात येते.

तात्या बापट समितीतर्फे गेली २१ वर्षे ही आरोग्य सेवा सुरू आहे. त्यात नमस्कार फाऊंडेशनच्या वतीने विविध औषधि वनस्पती वापरून बनवलेले वेदना शामक आयुर्वेदिक तेल ने पायाला मसाज करण्याची संकल्पना गेले ६ वर्ष सुरू आहे. हजारो वारकऱ्यांनी ही सेवा घेतली आहे.

पुणे शहरातून संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा दिवेघाट ओलांडून साासवडला गेला की ही सेवा सुरु करण्यात येते. सासवड ते पंढरपूर पर्यंत हे सेवा अभियान प्रकाश साकुरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात येते. यामध्ये पिंपरी चिंचवडचे अनेक डॉक्टर व मसाज थेरपिस्ट यांचा सहभाग असतो. नमस्कार फाउंडेशनसाठी मुकेश चुडासमा,अतुल भोंडवे, दिलीप सोनीगरा यांचे विशेष योगदान आहे, अशी माहिती नमस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास जोशी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT