ashadi wari 2023 it employee participate in wari alandi pandharpur warkari india culture
ashadi wari 2023 it employee participate in wari alandi pandharpur warkari india culture  sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : ‘आयटीयन्स’ अनुभवताहेत वारीतील संस्कार

शंकर टेमघरे

लोणंद - ‘‘आयटी’च्या ‘ग्रुप’वर वारीची जाहिरात पाहिली. नावनोंदणी केली. वारीला जाण्यासाठी सुटीचा दिवस ठरवला. ठरल्याप्रमाणे पहाटे निघालो. सकाळी सहा वाजता वारीत सहभागी झालो. दिवसभर रणरणत्या उन्हात पायी चालत राहिलो. कानावर पडणारा टाळ-मृदंगाचा ध्वनी पायाला बळ देत होता. संध्याकाळ झाली. माऊलींची पालखी थांबली. वाटचाल संपली. या संपूर्ण वाटचालीत खूप रिलॅक्स वाटले,’’ ही भावना आहे, आयटी इंजिनियर विजय फालक यांची.

बौद्धिक काम करताना तणावमुक्तीसाठी, तसेच वारकऱ्यांकडून काही गुण शिकण्यासाठी आयटी दिंडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या टप्प्यांवर सुमारे दोन हजार आयटीयन्स पंढरीचे वारकरी होत आहेत. पंढरीच्या आषाढी वारीत परंपरागत अनेक दिंड्यांमध्ये वारकरी वारीची वाट चालतात.

त्यात काही समाजाच्या तसेच काही भौगोलिक विभागनिहाय सहभागी झालेले दिसतात. वारीत उच्चशिक्षितांचा सहभाग वाढत आहे. याचाच एक भाग आजच्या वाटचालीत डोक्यावरील टोपीत ‘आयटी दिंडी’ असे लिहिलेले, पाठीवर सॅक, शुभ्र पांढरा कुर्ता, पायजमा घातलेले काही वारकरी दिंड्याच्या शेजारून चालत होते. त्यांना विचारले असता, म्हणाले, ‘‘आमची आयटी दिंडी असते.’’

आयटीएन्सची भावना

आषाढीची वारीची परंपरा टिकून ठेवण्यासाठी वारकरी न सांगता वारीत सहभागी होतात. त्यामुळे संस्कृती, परंपरा जगण्याच्या उद्देशाने आयटी दिंडी सुरू झाली. दरवर्षी आयटी दिंडीची जाहिरात आयटीतील कंपनी ग्रुपवर टाकली जाते. या कर्मचाऱ्यांना अठरा दिवस शक्य होत नसल्याने सुटीच्या एका दिवशी ही मंडळी वारी करतात.

आयटी दिंडीत रजिस्ट्रेशन केले जाते. सकाळी लवकर हे आटीयन्स वारीच्या गावात पोहोचतात. विसावा, दुपारचे जेवण वगैरे सर्व मॅपवर शेअर केले जाते. ‘दिंडी’ सकाळी सुरू होते व सायंकाळी आपापल्या घरी जाते. या वारीत आत्मिक समाधान लाभते, अशीच भावना या आयटीएन्सची आहे.

‘आयटी’यन्स वारीत काय शिकतात?

  • आध्यात्मिक साधनेने आत्मिक समाधान

  • समुहासमवेत राहल्यास वैचारिक प्रगल्भता

  • चालणे, पाणी आणि शारीरिक क्षमता याचे आत्मचिंतन

  • वारकऱ्यांमधील सकारात्मक ऊर्जेची अनुभूती

  • वारकऱ्यांचे साधी राहणी, सात्विक विचार, निष्ठा यांची शिकवण

  • एकमेकांना मदत करण्याची भावना, सर्वांना सोबत घेऊन म्हणजे चालण्याची पद्धती

  • कष्टातून एका ध्येयाकडे जाण्याच्या राजमार्गाची प्रचिती

वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही आयटी क्षेत्रातील भाविकांपर्यंत पोचतो. त्यांना वारीत निघण्यापासून ते पुन्हा सुखरुप घरी पोचविण्यापर्यंत सर्व जबाबदारी आयटी दिंडी घेते. सकाळी नाष्टा दिला जातो. दिंडीत दुपारचे जेवण दिले जाते.

- सचिन झापकर, समन्वयक, आयटी दिंडी

हा वैष्णवांचा सोहळा प्रत्यक्षात किती अलौकिक आहे, याची प्रचिती आली. काय तो जनसागर, भक्तिमय वातावरण, अभंगांच्या निरनिराळ्या चाली ऐकून मन शांत झाले.

- मंगेश बामणे, ‘आयटी’ कर्मचारी

आयटी दिंडीच्या माध्यमातून आम्हाला वारकऱ्यांसमवेत चालण्याचा, त्यांच्यासमवेत जेवण्याचा आनंद घेता येतो. एक दिवस जरी चालत असलो तरी वारीचा फील वर्षभर राहतो.

- गौरी पुरोहित, ‘आयटी’ कर्मचारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT