Ashadi Wari 2023 sakal saath chal sant tukaram maharaj environmental conservation sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : पर्यावरण संवर्धनासाठी पिंपरीत उद्या ‘साथ चल’

‘सकाळ माध्यम समूहा’चा उपक्रम : पुण्यातील पुलगेट येथे बुधवारी शपथ

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : आषाढी वारीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘साथ चल’ उपक्रमांद्वारे ‘वारी विठुरायाची आणि पर्यावरण संवर्धनाची’ अर्थात ‘पर्यावरण वारी’चा संकल्प केला आहे. पिंपरीत सोमवारी (ता. १२) आणि पुण्यात बुधवारी (ता. १४) ‘साथ चल’ उपक्रम राबविण्यात येणार असून, पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली जाणार आहे. यात देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थान आणि मानकरी सहभागी होणार आहेत. ‘फिनोलेक्स केबल्स’ प्रायोजक आहेत.

संत तुकाराम महाराज यांच्या ‘वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें।’ या अभंगातील ‘आकाश मंडप पृथुवी आसन। रमे तेथें मन क्रीडा करी।।’ या वाचनातून विश्वाचे महत्त्व विशद केले आहे. आकाशाचा मंडप आणि पृथ्वीचे आसन असलेल्या वैभवशाली विश्वाची महती जपण्यासाठी पृथ्वीला प्रदूषणमुक्त ठेवणे व पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे.

हाच संदेश देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने आषाढी वारीनिमित्त ‘वारी विठुरायाची आणि पर्यावरण संवर्धनाची’ संकल्प केला आहे. त्याअंतर्गत सोमवारी (ता. १२) पहाटे साडेपाच वाजता पिंपरीतील मोरवाडी चौकात पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली जाणार आहे.

त्यानंतर पालखी सोहळ्यासोबत एचए कंपनी कर्मचारी वसाहतीच्या प्रवेशद्वारापर्यंत (भुयारी मार्गापर्यंत) चालत जायचे आहे. त्या ठिकाणी सहभागी भाविकांसमवेत शपथ घेतली जाणार आहे. पुण्यातील पुलगेट येथील महात्मा गांधी बसथांबा येथे बुधवारी (ता. १४) सकाळी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करून शपथ घेतली जाणार आहे.

‘सकाळ’च्या ‘साथ चल’अंतर्गत ‘वारी विठुरायाची, पर्यावरण संवर्धनाची’ उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने वृक्ष लावून पर्यावरण संरक्षण गरजेचे आहे.

- पुरुषोत्तम महाराज मोरे, अध्यक्ष, संत तुकाराम महाराज संस्थान

पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी जागृती आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने निसर्गाशी मैत्री करणे व संवर्धन करणे गरजेचे आहे. हा संदेश या उपक्रमातून दिला जाईल.

- संजय महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख

‘सकाळ’चा उपक्रम खूप आनंददायी आणि प्रेरणादायी आहे. अनेक वर्ष ‘सकाळ’ समूह समाजात जनजागृती करत आहे. या उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो.

- माणिक महाराज मोरे, विश्वस्त

दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहे. भविष्याचा विचार करता आजपासूनच पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. आषाढी वारीत हा संदेश लाखो भाविकांपर्यंत पोचेल. चांगला उपक्रम आहे.

- भानुदास महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख

संत तुकाराम महाराजांनी ‘वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरे’ असा संदेश दिला आहे. त्याची समाजाला गरज आहे. ‘सकाळ’च्या उपक्रमात पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी पुढे यावे.

- अजित महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख

आषाढी वारीच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक झाड लावले तरी पर्यावरण संरक्षणासाठी मदत होईल. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी उपक्रमात सहभागी व्हावे.

- संतोष महाराज मोरे, विश्वस्त

पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे. सर्वांनी यात सहभागी व्हावे. सरकारनेही जागृतीसाठी नागरिकांना प्रोत्साहन द्यावे. ‘सकाळ’चा उपक्रम अतिशय चांगला आहे.

- विशाल महाराज मोरे, विश्वस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT