Astro Tips esakal
संस्कृती

Astro Tips : केस कापण्याचा आर्थिक समृद्धीशी आहे संबंध; फक्त वार चुकवू नका!

चुकीच्या वेळेत आणि चुकीच्या दिवशी केस कापल्यास त्याचा प्रभाव तुमच्या आयुष्यावरही होऊ शकतो

सकाळ ऑनलाईन टीम

Astro Tips : शास्त्रात सुखी आणि समृद्ध जीवनासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. शास्त्रात असे देखील म्हटले आहे की व्यक्तीच्या प्रत्येक कामाचा प्रभाव त्याच्या आयुष्यावर पडतो. ग्रह नक्षत्रांचासुद्धा आपल्यावर प्रभाव पडत असतो. हा प्रभाव चांगला किवा वाईटही असू शकतो. तेव्हा प्रत्येक कामाची शास्त्रशुद्ध योग्य वेळ माहिती असायला हवी.

महिला किंवा पुरुष त्यांना वेळ मिळेल त्या दिवशी केस कापतात. मात्र तुम्ही चुकीच्या वेळेत आणि चुकीच्या दिवशी केस कापल्यास त्याचा प्रभाव तुमच्या आयुष्यावरही होऊ शकतो. काही कामं चुकीच्या वेळेत केल्याने त्याचा आर्थिक आणि मानसिक त्रास आपल्यालाच होतो. तेव्हा आज आपण अशा काही उपायांबाबत जाणून घेणार आहोत, ज्याने तुमची आर्थिक तंगी दूर होईल.

Astro Tips

करा हे उपाय

सगळ्या दिवसांमध्ये बुधवार आणि शुक्रवार हे दिवस अत्यंत शुभ मानले जातात. ज्योतिष्यांच्या मते, बुधवारी केस किंवा नख कापणे फारच शुभ मानले जाते. या दिवशी केस कापल्याने घरी कधीच आर्थिक अडचणी येत नाहीत. तसेच घरात कायम सुख समृद्धी राहाते. म्हणूनच केस कापयचे असल्यास बुधवार किंवा शुक्रवार हा दिवस निवडावा. तसेच नखे कापण्यासाठी शुक्रवार हा दिवस शुभ आहे. (Astro Tips)

शास्त्रात असे स्पष्ट सांगण्यात आले आहे की बुधवार किंवा शुक्रवारी केस कापल्याने तुमच्या यशात वाढ होते आणि घरात सुख समृद्धीचा कायम वास असतो. ज्योतिषशास्त्राच्या मते, रविवार, सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी चुकूनही केस, दाढी किंवा नखे कापू नये. त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येतो.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT