Astro Tips For Wealth Esakal
संस्कृती

Astro Tips: ज्योतिष शास्रानुसार या गोष्टी केल्यास तुमच्यावर सदैव लक्ष्मी प्रसन्न राहिलं...

प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी यावी, आपल्यावर सदैव लक्ष्मी प्रसन्न रहावी अशी इच्छा असते.

सकाळ डिजिटल टीम

Astro Tips For Wealth: प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी यावी, आपल्यावर सदैव लक्ष्मी प्रसन्न रहावी अशी इच्छा असते. त्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करून आपल्या कुटुंबाला आणि स्वतःला सुखी ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतो.

परंतु  बहुतेक वेळा कठोर परिश्रम करूनही अनेकांना त्याचे सकारात्मक परिणाम मिळत नाहीत आणि सतत समस्या येतात. या त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. ते उपाय नेमके कोणते आहे त्याचीच माहिती आपण आजच्या लेखात पाहू या...

1) ज्योतिष शास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपर्‍यात नियमितपणे गंगाजल शिंपडल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा संपते. आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार आपोआप वाढतो.

2) ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये देव्हाऱ्यात नियमितपणे पूजा करून दिवा लावल्याने लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहते. तसेच रविवारी उंबराच्या झाडाची मुळं आणून त्याची विधिवत पूजा करून ती तिजोरीत किंवा पैसा ठेवलेल्या ठिकाणी ठेवाल्यास घरात लक्ष्मी टिकून राहते.

3) धार्मिक मान्यतांनुसार, सकाळी उठून ब्रश करणे किंवा शरीराची इतर स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरच कोणत्याही प्रकारचे अन्न सेवन करावे. आंघोळ न करता धार्मिक ग्रंथ आणि मूर्तीला हात लावणे अशुभ मानले जाते. त्यामुळे घरातील लक्ष्मी कोपुन तुमच्या घरातील समृद्धीला उतरती कळा लागू शकते.

4) ज्योतिष शास्त्रानुसार दोन्ही वेळेचे भोजन करतांना जआपले तोंड पूर्वेकडे असावे. कारणपूर्वेकडे तोंड करून अन्न खाल्ल्याने जीवन आनंदी होते. आणखी एक गोष्ट म्हणजे पायात बुट किंवा चप्पल घालून कधीही जेवू नये.  

5) ज्योतिष शास्त्रानुसार तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यात देवाला अर्पण केलेली फुले सुकवल्यानंतर ते आदरपूर्वक वाहत्या पाण्यात विसर्जित करावीत. घराच्या आजूबाजूला पाणी असणारी जागा नसेल तर एखाद्या ठिकाणी खड्डा खणून तिथेही पुरून टाकली तरी चालतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT