Astro Tips  Esakal
संस्कृती

Astro Tips: या दोन दिवशी अगरबत्ती लावल्यास होऊ शकते तुमचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

अगरबत्ती लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही आणि वातावरण सकारात्मक राहते.

सकाळ डिजिटल टीम

हिंदू धर्मात देवाची पूजा करताना अगरबत्ती, धूपबत्ती लावण्याची परंपरा आहे. अगरबत्ती ही शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. असे मानले जाते की, सकाळ-संध्याकाळ घरात अगरबत्ती लावल्याने सकारात्मक उर्जा संचारते, घरात सुख-समृद्धी टिकून राहते, परंतु वास्तुशास्त्रात अगरबत्तीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. रोज सकाळी देवतांच्या पूजा-विधी वेळी अगरबत्ती वापरली जात असली तरी आठवड्यातील दोन दिवशी अगरबत्ती वापरण्यास मनाई आहे. असे केल्याने घरातील शांती-समृद्धीवर परिणाम होऊ शकतो. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊ या आठवड्यातील कोणत्या दिवशी अगरबत्ती लावू नये याविषयीची सविस्तर माहिती..

सुरूवातीला पाहू या अगरबत्ती लावण्याचे फायदे...

1) अगरबत्ती लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही आणि वातावरण सकारात्मक राहते. 

2) अगरबत्ती लावल्याने देवताही प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने सुख-समृद्धी प्राप्त होते. 

3) अगरबत्तीचा धूर हवा शुद्ध करतो आणि हानिकारक जीवाणू नष्ट करतो. 

4) अगरबत्ती व्यतिरिक्त, धूपबत्ती, कापूर लावून देवाची पूजा करणे देखील शुभ आहे.

आता बघू या कोणत्या दिवशी अगरबत्ती लावू नये.. ज्योतिषशास्त्रानुसार, अगरबत्ती बनवण्यासाठी बांबूचा वापर केला जातो. वास्तूनुसार, घरामध्ये बांबूच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, त्यामुळे वातावरण प्रसन्न राहते. परंतु रविवारी आणि मंगळवारी बांबू जाळण्यास शास्त्रात निषिद्ध मानले जाते. 

कोणत्या प्रकारचे नुकसान होऊ शकते?

1) रविवारी आणि मंगळवारी अगरबत्ती लावू नये, असे केल्याने मानसिक आणि आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो. त्यामुळे घरात गरिबी येते आणि कुटुंबात तणाव राहतो, असे मानले जाते.

2) पौराणिक शास्त्रानुसार मंगळवार आणि रविवारी बांबू जाळल्याने संततीची हानी होण्याचा धोका असतो. 

3) मंगळवार आणि रविवारी या दिवशी बांबू जाळल्याने पितृदोष होतो, त्यामुळे कुटुंबात सुख-शांती राहत नाही. बांबू जाळल्याने दुर्दैव येते. 

4) तुम्हाला आर्थिक संकटातून जावे लागेल, त्यामुळे या दोन दिवशी शास्त्रात अगरबत्ती जाळण्यास मनाई आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT