Astro Tips esakal
संस्कृती

Astro Tips : घरात योग्य दिशेत दिवा लावल्यास उजळेल भाग्य, घरात पैशांच्या भरभराटीसह नांदेल सुखसमृद्धी

शास्त्रात दिवा लावण्याचे काही नियम सांगण्यात आले आहे, ज्यांचे पालन केल्यास तुमच्या घरात सकारात्मक उर्जेचा वास राहील

सकाळ ऑनलाईन टीम

Astro Tips : हिंदू धर्मात पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे वेगवेगळ्या प्रकारे महत्व सांगितले आहे. असे म्हणतात की, दिवा लावल्याशिवाय पूजा केल्यानंतर त्याचे फलप्राप्ती तुम्हाला मिळत नाही. देवाला नैवेद्य दाखवण्याआधी देवघरात आवर्जून दिवा लावला जातो. शास्त्रात दिवा लावण्याचे काही नियम सांगण्यात आले आहे, ज्यांचे पालन केल्यास तुमच्या घरात सकारात्मक उर्जेचा वास राहील. शिवाय घरातील नकारात्मक उर्जाही नष्ट होईल. चला तर दिवा लावण्याच्या काही महत्वाच्या नियमांबाबत जाणून घेऊया.

देवघरात दिवा लावताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

शास्त्रात देवघरात किंवा मंदिरात दिवा लावण्याच्या योग्य दिशेबाबत सांगण्यात आले आहे. यानुसार घराच्या पश्चिम दिशेत दिवा लावणे शुभ मानले जाते. पश्चिम दिशेत दिवा लावल्याने घरात सकारात्मकतेचा वास असतो आणि घरात सुखसमृद्धीही नांदते.

ज्योतिष शास्त्रानुसार घरात कधीही खंडित म्हणजेच तुटलेल्या, मोडलेल्या दिव्याच्या वापर करू नये. रोजच्या वापरातला दिवा खंडित झाल्यास तो लगेच बदलावा. खंडित दिवा घरात नकारात्मकता घेऊन येतो. ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. (Hindu Religion)

याशिवाय जेव्हा तुम्ही घरात दिवा लावता तेव्हा दिव्याची वात ही पूर्व दिशेला असावी. असे केल्यास घरात सुखसमृद्धी नांदते. असे म्हणतात की दिवा लावणारा व्यक्ती हा दीर्घायुषी होतो.

शास्त्रात दिवा लावण्याबरोबरच त्याच्या वातीबाबतही काही नियम सांगण्यात आले आहेत. तुपाचा दिवा लावताना फक्त फुलवातच वापरावी. तेलाचा दिवा लावताना लांब वात वापरा. पूजेच्या वेळी तेलाचा दिवा नेहमी उजव्या बाजूला ठेवावा आणि तुपाचा दिवा नेहमी डाव्या बाजूला ठेवावा. (Astro Tips)

ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला ठेवणे वर्ज्य आहे. या दिशेला ज्योत ठेवल्याने धनहानी होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT