Astro Tips  esakal
संस्कृती

Astro Tips : आर्थिक स्थिती मजबूत करायचीय, मग करा या डाळीचा उपाय

नशीब वाढवण्यासाठी काळ्या उडीद डाळीचे उपाय प्रभावी

सकाळ वृत्तसेवा

ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या बळकटीसाठी आणि त्रास दूर करण्यासाठी विविध उपाय सांगितले आहेत. या उपायांचा अवलंब केल्याने एकीकडे संकटांपासून मुक्ती मिळते. दुसरीकडे आर्थिक स्थितीही मजबूत आहे.ज्योतिषशास्त्रात अनेक प्रकारचे उपाय किंवा युक्त्या सांगण्यात आल्या आहेत, ज्याचा अवलंब करून आपल्या आयुष्यातल्या अनेक समस्या टाळता येतात. हे उपाय करून आपण ग्रहांची वक्री शांत करु शकतो शिवाय याचा फायदा देखील होऊ शकतो. घराची आर्थिक स्थिती मजबूत होऊन सुख, समृद्धी आणि आनंद मिळतो.

या उपायांसाठी उडदाची डाळ खूप प्रभावी आहे; हे उपाय सहसा शनिवारी करावे. नशीब वाढवण्यासाठी काळ्या उडीद डाळीचे उपाय खूप प्रभावी मानले जातात. त्यांचा अवलंब केल्याने धनलाभासह सुख-समृद्धी वाढते. उडीद डाळीचे उपाय शनिवारी करणे अधिक फलदायी मानले जाते.उडदाची डाळ व्यवसायासाठीही प्रभावी आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर ऑफिसमध्ये कोणतीही लोखंडी वस्तू आणा, त्यानंतर त्या ठिकाणी स्वस्तिक चिन्ह बनवा आणि त्यावर काळे उडीद ठेवा. यानंतर ऑफिसमध्ये आणलेली लोखंडी वस्तू त्यावर ठेवा. असे केल्याने व्यवसायात खूप प्रगती होते.

वैयक्तिक त्रास दूर करण्यासाठी खालील काही उपाय करू शकतात.

१. उडदाच्या डाळीचे वडे बनवा.

शनिवारी पलंगाखाली एका भांड्यात मोहरीचे तेल ठेवा. दुस-या दिवशी या तेलात उडीद डाळीचे वडे बनवून कुत्र्यांना आणि गरिबांना खायला द्यावे. असे केल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात आणि गरिबी दूर होते.

२.कावळ्यांना खायला द्या

शनिदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी उडदाची डाळ देखील प्रभावी आहे. शनिवारी थोडी उडीद डाळ डोक्यावरून पायापर्यंत ३ वेळा उतरवून कावळ्यांना खायला द्या. असे सलग ७ शनिवारी करा, शनिदोष दूर होतो.

३. पिंपळाचे ​​झाड

शनिवारी संध्याकाळी उडीदाच्या दोन दाण्यांमध्ये थोडे दही आणि सिंदूर मिसळा. सलग २१ दिवस पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. मात्र, या काळात एक गोष्ट लक्षात ठेवावी की, पिंपळाच्या झाडाखाली धान्य ठेवून परत येताना मागे वळून पाहू नका. यामुळे आर्थिक समस्या दूर होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anantnag Attack: जम्मू-काश्मीर पुन्हा हादरलं! अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला; पोलीस जवान शहीद, हल्ल्याची जबाबदारी कुणी स्वीकारली?

CJP Protest Delhi : आता चर्चा जंतर मंतरवरच! अन्यथा...; CJPची मोठी अट, काय म्हणाले?

Live Updates Marathi : उजनी धरणातून भीमा नदीत ३५०० क्युसेक ने विसर्ग सुरू

भारतीय संघात स्थान मिळत नाही म्हणून, कुलदीप यादवने निवडली दुसरी वाट! आता 'या' परदेशी संघासाठी खेळणार पाच वन डे सामने

Loni Kalbhor Accident: भरधाव ट्रकने धडक दिल्याने ७२ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी; चालकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT