Astro Tips esakal
संस्कृती

Astro Tips : तोतरे बोलतात? बोलण्याची शैली ठरवते तुमचं व्यक्तिमत्व

व्यक्तीची बोलण्याची पद्धत देखील त्याच्या स्वभावाबद्दल बरच काही सांगू शकते

सकाळ डिजिटल टीम

Astro Tips : समुद्रशास्त्रामध्ये शरीराचे अवयव, रेषा, खुणा याद्वारे व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. एवढच नाही तर माणसाच्या बोलण्याच्या पद्धतीबद्दलही सामुद्रिक शास्त्रात बरीच माहिती दिली आहे. प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी असते. एखाद्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत देखील त्याच्या स्वभावाबद्दल बरच काही सांगू शकते.

वेगवान बोलणाऱ्या व्यक्तीची वैशिष्ट्ये

सामुद्रिक शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला कोणताही संकोच न करता थेट आणि वेगात बोलण्याची सवय असेल तर तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असतो आणि त्याचा स्वभाव खूप आनंदी असतो. असे लोक खूप आनंदी राहतात आणि त्यांची वागणूक खूप कार्यक्षम असते. ही लोकं खूप उत्साही असतात. यांना कोणत्याही वादात पडणं आवडत नाही. ही कधीकधी थोडे चिडचिड करतात.

अडखळत बोलणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव

बुध ग्रहाच्या प्रतिकूलतेमुळे बोलतांना अडखळणे किंवा शब्द अडकणे असं होऊ शकतं. जे लोक असं बोलतात त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता असू शकते. छोट्या छोट्या गोष्टीही त्यांच्या मनाला लागू शकतात, यांचं मन मात्र साफ असतं.

मोठा आवाजात बोलणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव

अनेक लोकांचा आवाज खूप जड असतो, ते अगदी बेसमध्ये बोलतात. समुद्रशास्त्रानुसार असे लोक इतरांना ओव्हर पॉवर करू पाहतात, ही लोकं बोलत असतांना त्यांना मध्ये दुसरं कोणी बोललेलं अजिबात आवडत नाही. जड वाणीमुळे गुरूचा प्रभाव दिसून येतो. या प्रकारचा आवाज असलेले लोक त्यांच्या सभोवतालच्या लोकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात.

दुसरे बोलत असतांना मध्येच बोलणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव

दुसरे बोलत असतांना मध्येच आपला मुद्दा मांडण्याचा काहींचा स्वभाव असतो. समुद्रशास्त्रानुसार असे लोक थोडे हट्टी स्वभावाचे असतात. पण, अशा लोकांच्या आयडिया खूप चांगल्या असतात. अशा लोकांच्या विचारांकडे लक्ष दिले नाही तर ते खूप चिडतात.

अस्पष्ट किंवा हातच राखून बोलणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव

समुद्रशास्त्रात असे सांगितले आहे की जे लोक अस्पष्ट शब्दात बोलतात, असे लोक कामाच्या बाबतीत निष्काळजी असतात. ही लोकं खरं बोलणारी असतात आणि प्रामाणिक सुद्धा असतात. सतत मन जपण्यासाठी ही लोकं स्पष्ट बोलत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Delay Maharashtra : आधी 11, मग 15 अन् आता थेट...; महाराष्ट्रात 'या' तारखेला मान्सून सक्रिय होणार! हवामान खात्याचा नवा अंदाज, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस?

Sanchita Ugale: छावा चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं जीवन, नालासोपाऱ्यातील राहत्या घरात आढळला मृतदेह; DDLJ मध्येही काम केलं होतं

पाकिस्तानी हवाई दलाचं विमान कोसळलं, २ पायलटचा मृत्यू; घटना CCTVत कैद

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत अधिकाऱ्यासमोर शिवसैनिकांनी निमंत्रण पत्रिका फाडली

Mahabaleshwar Water Shortage : महाबळेश्वर-पाचगणीवर मोठं संकट! 'वेण्णा लेक'ने गाठला तळ; केवळ 50 ते 52 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक, पाऊस लांबल्यास काय होणार?

SCROLL FOR NEXT