संस्कृती

Astro Tips : जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत करा हे काम; अन्यथा भोगाव्या लागतील नरक यातना

पाप- पुण्याचा हिशोब देवाघरी गेल्यावर होतो

सकाळ डिजिटल टीम

पूणे : पाप- पुण्याचा हिशोब देवाघरी गेल्यावर होतो असे शास्त्रात सांगितले जाते. लहानपणापासून मनुष्याच्या मनावर ते बिंबवले जाते. त्यामुळे या गोष्टीला घाबरून का होईना मनुष्य जीवनात चार गोष्टी करून पुण्य कमावतो. पुण्य कमावण्यासाठी शास्त्र, पुराणात अनेक उपाय सांगितले आहेत.

पुण्य कमावण्यासाठीचा सोपा उपाय म्हणजे झाडे लावणे. तूम्ही म्हणाल की, झाडे लावणे ह्यात काय विशेष ते तर पर्यावरण संवर्धनाचे काम आहे. असे असले तरी शास्त्रात काही विशिष्ट झाडे लावण्याचा सल्ला दिला जातो. अशी अनेक झाडे आणि वनस्पती शास्त्रात सांगण्यात आल्या आहेत. ज्यांची पूजा केल्याने किंवा ती लावल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो.

यातील काही झाडे देवांचे निवासस्थान आहेत. तर काही झाडे देवांना प्रिय आहेत. दोन्ही मार्गांनी त्या वृक्षांची पूजा केल्याने पुण्यप्राप्ती होते. तर अशीही काही झाडे आहेत ज्यामुळे आपल्या पुर्वजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो. त्यामुळे ती झाडे कोणती ते पाहुयात.

भगवान श्रीकृष्णाचा सल्ला

भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की, एकवेळ मुले आपल्या पितरांसाठी दान करण्याचे टाळतील, विसरतील पण फळे, फुले, पाने झाडे नेहमी दान करतात. त्यामुळे दान करण्याऐवजी झाडे लावावीत. त्याचे पुण्य त्या व्यक्तीला नक्कीच मिळते. श्री कृष्णाने आठ झाडे लावण्यास सांगितले आहे. ती कोणती ते पाहुयात.

कोणते झाड लावावे

श्रीकृष्णाने सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीने अशी झाडे लावली पाहिजेत ज्याची फळे, फुले, मुळे, पाने, साल, लाकूड याने सर्वांचे कल्याण करतील. यामध्ये पिंपळ, कडुनिंब, वड, चिंच, कवठ, बेल, आवळा आणि आंब्याच्या झाडांचा समावेश आहे.

देवाचे निवासस्थान

यामधील वड, पिंपळ हि झाडे साक्षात देवाच्या जागी आहेत. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, श्री दत्त महाराज यांच्यासह अनेक देवता या झाडांखाली बसायचे. ते त्यांचे निवासस्थानच आहे. आजही दत्त महाराजांच्या कोणत्याही मंदिरात तूम्हाला पिंपळाची असंख्य झाडे पहायला मिळतील. तर अक्कलकोटमधील स्वामींच्या मठातील वडाच्या झाडातून आजही जप ऐकू येतो, अशी मान्यता आहे.

किती झाडे लावावीत

पिंपळ, कडुलिंब, वड, कवठ, बेल आणि आवळा यांचे प्रत्येकी एक एक झाड लावावे. तर पाच आंब्याची झाडे आणि 10 चिंचेची झाडे लावावीत. एकंदरीत माणसाने संपूर्ण आयुष्यात २१ झाडे लावली पाहिजेत.

ज्या झाडाची सावली घनदाट असते. ज्याच्या सावलीत उभे राहील्यास मनुष्याला प्रसन्न वाटते. ज्याची पाने, फुले व साल खाऊन प्राणी, पशुंचे पोट भरते. ज्याच्या फुलांमुळे देवता आणि फळांनी पितर प्रसन्न होतात, अशी झाडे लावण्यासाठी निवडावीत. आपण केवळ वर्षातून एकदाच पिंडदान करतो पण झाडे रोज दान करतात.

अशी मान्यता आहे की, जो माणूस एक दोन नव्हे तर झाडांची बाग लावतो. त्याला स्वर्ग प्राप्ती होते. त्या व्यक्तीला बाग लावल्याने तिची काळजी घेतल्याने गायत्री मंत्र, दान आणि त्यागाचे फळ मिळते. जगत असताना भरभराट तर होतेच पण मृत्यूनंतर मोक्ष नक्कीच मिळतो.सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणताही गोष्टींचे समर्थन करत नाही. उपाय करण्यापूर्वी ज्योतिष्य तज्ञ्जांचा सल्ला अवश्य घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

SWAYAM Exam 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SWAYAM जानेवारी 2026 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या परीक्षा कधी होणार

Gold Rate Today : सोनं-चांदी सुसाट! जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे MCX बाजारात सोनं २ हजारांनी महागलं; मकर संक्रांतीला भाव कमी होणार?

ट्रम्प व्हेनेझुएलाचे काळजीवाहू राष्ट्रपती, स्वत:च शेअर केला फोटो; काय म्हणाले?

IND vs NZ 1st ODI : भारताला मोठा धक्का! रिषभ पंतनंतर आणखीन एका सुपरस्टारची मालिकेतून माघार; वर्ल्ड कपपूर्वी वाढली चिंता

SCROLL FOR NEXT