Kaala Dhaga
Kaala Dhaga  Sakal
संस्कृती

Kaala Dhaga : सावधान! 'या' राशीच्या लोकांनी चुकूनही बांधू नये काळा धागा; फायद्याऐवजी होईल नुकसान

सकाळ डिजिटल टीम

Kaala Dhaga : तुम्ही अनेकदा अनेकांच्या गळ्यात, हाताला किंवा पायात काळा धागा बांधलेला पाहिला असेल. अशा स्वरूपााचा धागा बांधण्यामागे कुणाची दृष्ट किंवा शनिदोष टाळण्यासाठी हा धागा बांधला जातो अशी मान्यता आहे.

ज्योतिष शास्त्रातदेखील काळा धागा बांधण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. परंतु, हा धागा बांधल्याने सर्वानाच फायदा होतोच असे नाही. हा धागा बांधल्याने काही जणांना फायद्याऐवजी नुकसानही होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला काळा धागा बांधण्याचे फायदे आणि तोटे तसेच कोणत्या राशीच्या व्यक्तींनी हा धागा बांधू नये याबाबत सांगणार आहोत.

हे आहेत फायदे

शनि ग्रहाचा रंग काळा आहे. अशा स्थितीत काळ्या रंगाचा धागा बांधल्याने तुमच्या कुंडलीतील शनि ग्रह अधिक बलवान होण्यास मदत होते. याशिवाय वाईट नजरेपासूनही रक्षण होते. एवढेच नाही तर, शनिदोषापासूनही मुक्ती मिळते.

या राशीच्या व्यक्तींनी बांधू नये काळा धागा

एकीकडे काळ्या धागा बांधून फायदा होतो असे सांगितले जाते. मात्र, काही जणांना हा धागा बांधून फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची भीती असते. ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक आणि मेष राशीच्या लोकांनी काळा धागा बांधू नये. कारण, वृश्चिक राशीच्या पहिल्या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळाचा रंग लाल आहे. असे मानले जाते की, मंगळ काळ्या रंगाचा तिरस्कार करतो. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी काळा धागा अजिबात घालू नये.

मेष राशीचा स्वामीही मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनीही काळा धागा बांधणे टाळावे. ज्योतिषांच्या मते, काळा धागा बांधल्याने या राशीच्या व्यक्तींना धन, सन्मान आणि आरोग्याची हानी होऊ शकते.

काळा धागा परिधान करताना लक्षात ठेवा हे नियम

जर, तुम्ही काळा धागा बांधणार असाल तर, यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे. त्यानुसार काळा धागा घालण्यासाठी मंगळवार आणि शनिवार या दिवसांची निवड करावी. या दिवशी उजव्या पायावर काळा धागा बांधावा. या दिवशी काळा धागा बांधल्याने व्यक्तीच्या जीवनात आर्थिक सुख आणि समृद्धी येते. यासोबतच ज्योतिषशास्त्राच्या नियमांनुसार व्यक्तीने काळ्या धाग्याने इतर कोणताही धागा बांधू नये असे करणे अशुभ मानले जाते.

शनिवारी आणि मंगळवारी काळा धागा बांधणे शुभ असते. काळा धागा बांधण्यापूर्वी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्या तसेच धागा बांधताना ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ॥ या रुद्र गायत्री मंत्राचा जप करावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. यासंबंधी अधिक तपशीलांसाठी तुम्ही ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT