Astrology esakal
संस्कृती

Astrology : अच्छे दिन येण्याआधी तुम्हाला मिळतात हे 7 संकेत, श्रीमंतीचे द्वार आपोआप उघडेल

जेव्हा तुमच्या जीवनात मोठे बदल होणार असतात तेव्हा ईश्वराद्वारे तुम्हाला काही संकेत मिळतात अशी मान्यता ज्योतिषशास्त्रात आहे

सकाळ डिजिटल टीम

Astrology : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा त्याला निराशाच निराशा मिळते. जीवनातील काही अकस्मात घटना माणसाला राजा ते रंक प्रवासातून जाण्यासा भाग पाडतात. मात्र जेव्हा तुमच्या जीवनात मोठे बदल होणार असतात तेव्हा ईश्वराद्वारे तुम्हाला काही संकेत मिळतात अशी मान्यता ज्योतिषशास्त्रात आहे. तेव्हा जाणून घेऊया या काही खास संकेतांबाबत जे तुमचे सुवर्ण दिवस येणार असल्याचे संकेत देतात.

ब्रम्ह मुहूर्तात झोप उघडणे

बहुतेक लोकांची झोप त्यांच्या नियमित वेळेच्या आधीच उघडते. जर तुमची झोप ब्रम्हमुहूर्तात म्हणजेच सकाळी ३-५ या कालावधीत उघडत असेल तर तुमच्या जीवनात खूप मोठा बदल घडणार आहे असे समजा.

अचानक खूश होणे

अनेकदा तुमच्या बाबतीत असे घडू शकते की, तुम्ही विनाकारणाने खूश होता. तेव्हा तुम्ही समजून घ्यावे की देव तुम्हाला काही चांगले संकेत देत आहे. ज्याप्रकारे तुम्हाला आनंदी होण्याची इच्छा होतेय अगदी त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही आनंद येणार आहे. तो आनंद येण्यापूर्वीच इश्वर तुम्हाला हे संकेत देतात.

गौमातेचं आगमन

जर गाय तुमच्या घरी रोज येत असेल किंवा तुमच्याकडे अन्नासाठी हंबरत असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे. जर तुमच्या घरात पक्षी आणि प्राणी घरटी बनवत असतील तर ते देखील खूप शुभ लक्षण मानले जाते. या व्यतिरिक्त जर तुमच्या घराभोवती पक्ष्यांचा किलबिलाट दिवसेंदिवस वाढत असेल तर हे चिन्ह देखील लवकरच जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार असल्याचे दर्शवते.

घरात मुले असणे

मुलांमध्ये देव वास करतो असे म्हणतात. जर लहान मुले किंवा बाळ अचानक तुमच्याकडे पाहून हसले किंवा तुमच्याशी काहीतरी सकारात्मक बोलले तर हे लक्षण आहे की जीवनात सकारात्मक गोष्टी घडणार आहेत.

5. स्वप्नात मंत्र ऐकू येणे

जर तुम्ही स्वप्नात राम राम असे मंत्र ऐकले तर ते खूप चांगले मानले जाते. जर ओम मंत्राचा प्रतिध्वनी ऐकू येत असेल तर ती देखील एक सकारात्मक गोष्ट आहे. स्वप्नात मंत्र, घंटा, शंख यांचे आवाज ऐकणे खूप शुभ लक्षण मानले जाते.

6. कर्जातून मुक्ती

अनेक वेळा तुम्ही पाहिले असेल की तुम्ही कर्जबाजारी झाला आहात आणि अचानक तुम्हाला कर्जमुक्तीचा मार्ग सापडला असेल, तर हे देवाकडून मिळालेले सकारात्मक संकेत आहे. किंवा पैशाच्या व्यवहारात तुमच्या बाजूने निर्णय झाला तर त्याचा अर्थ जीवनासाठी शुभ चिन्ह आहे. संपत्तीचे वेगवेगळे स्त्रोत असणे हे देखील ईश्वराचे लक्षण आहे. यावरून असे दिसून येते की जीवनातील आर्थिक संकटे संपणार आहेत. आयुष्यात पैशाचे आगमन खूप वेगाने होणार आहे. (Astrology)

7. पुरुषांमध्ये उजवा अवयव फडफडणे खूप शुभ मानले जाते. मग तो उजवा डोळा असो वा उजवा हात. हे सूचित करते की तुमची ताकद वाढणार आहे. याउलट जर महिलांमध्ये डावा अवयव फडफडत असेल तर ते चांगले लक्षण आहे. म्हणजेच स्त्रियांमध्ये डाव्या हाताची फडफड हे शुभ लक्षण मानले जाते आणि पुरुषांमध्ये उजव्या हाताची फडफड शुभ मानली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT