Astrology Benefits of drawing swastika according to astrology at home  Esakal
संस्कृती

Astrology: घरात ज्योतिषशास्त्रानुसार स्वस्तिक काढण्याचे फायदे...

स्वस्तिक हा शब्द तीन शब्दांपासून बनलेला आहे, 'सु' म्हणजे शुभ, 'अस'- म्हणजे अस्तित्व आणि 'के' म्हणजे कर्ता.

सकाळ डिजिटल टीम

हिंदू धर्म हा जगातील एकमेव धर्म आहे ज्यामध्ये अनेक चिन्हे पवित्र मानली जातात. यापैकी एक प्रतीक म्हणजे स्वस्तिक. अनेकदा आपण लोकांच्या घराबाहेर, पूजास्थळी किंवा मंदिरात स्वस्तिक बनवलेली पाहिली असेल. आपल्या सर्वांना हे देखील माहित आहे की हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्य करण्यापूर्वी स्वस्तिक चिन्ह बनवले जाते. आजच्या लेखात आपण घरात ज्योतिषशास्त्रानुसार स्वस्तिक काढण्याचे फायदे आणि स्वस्तिक काढायची योग्य पद्धत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

सुरूवातीला बघू या स्वस्तिकचा अर्थ काय आहे?

स्वस्तिक हा शब्द तीन शब्दांपासून बनलेला आहे, 'सु' म्हणजे शुभ, 'अस'- म्हणजे अस्तित्व आणि 'के' म्हणजे कर्ता. अशा प्रकारे स्वस्तिकाचा अर्थ शुभ आहे. स्वस्तिक हे गणेशाचे प्रतीक देखील मानले जाते आणि ज्या प्रकारे गणपतीची प्रथम पूजा केली जाते. तसेच हिंदू लोक शुभ कार्यापूर्वी स्वस्तिक चिन्ह काढतात.

घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी स्वस्तिक बनवले जाते, कारण त्याच्या चार रेषा चार दिशा दर्शवतात अशीही मान्यता आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढावे.

ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुम्हाला व्यवसायात नुकसान होत असेल तर ते कमी करण्यासाठी तुमच्या दुकानाच्या ईशान्य दिशेला सुक्या हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवून सलग 7 गुरुवार लावणे फायदेशीर ठरते.

कोणत्याही कामात यश हवे असल्यास घराच्या उत्तर दिशेला सुक्या हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवा.

घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी काळ्या रंगाचे स्वस्तिक बनवले जाते. असे मानले जाते की काळ्या रंगाच्या कोळशाने बनवलेले स्वस्तिक नकारात्मक ऊर्जा दूर करते.

ज्योतिषशास्त्रानुसार स्वस्तिक कसे काढावे?

स्वस्तिक काढताना आधी एक उभी रेष काढावी. त्यानंतर त्यावर आडवी रेष काढताना उभ्या रेषेला न कापता आडवी रेष काढावी. कारण मधले स्थान हे ब्रह्म देवाचे स्थान साठे त्यामुळे उभिरेश कधी कापायची नाही. त्यानंतर वरच्या बाजूला, उजव्या बाजूला, खालच्या बाजूला आणि नंतर डाव्या बाजूला चार रेषा काढाव्या. एवढ्यावरच स्वस्तिक संपत नाही. या चार रेषांना आणखी चार छोट्या छोट्या रेषा काढणे गरजेचे असते. त्यानंतर या स्वस्तिकमध्ये चार छोटी छोटी टीम्ब द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT