Shri Krishna Sakal
संस्कृती

Astrology : श्रीकृष्णाला मोराची पिसं का आवडतात? कुंडलीतला एक योग आहे कारण...

भगवान श्रीकृष्णाच्या प्रत्येक रुपात, मग तो विष्णू असो वा बालगोपाल, तुम्हाला मोराची पिसे नक्कीच सापडतील.

वैष्णवी कारंजकर

भगवान श्रीकृष्णाला मोराची पिसं खूप प्रिय आहेत. म्हणूनच तो नेहमी त्याच्या मुकुटावर मोराची पिसे घालतो. त्याला मोराचा मुकुटही म्हणतात. भगवान श्रीकृष्णाच्या प्रत्येक रुपात, मग तो विष्णू असो वा बालगोपाल, तुम्हाला मोराची पिसे नक्कीच सापडतील. चला जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णाला मोरपीस इतकं का आवडतं?

श्रीकृष्णाच्या कुंडलीत कोणता योग?

ज्योतिषशास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाच्या कुंडलीत कालसर्प योग होता. तर साप आणि मोर हे एकमेकांचे वैर मानले जातात. म्हणूनच कालसर्प योगाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कृष्णाने मोराची पिसे धारण केली.

भगवान श्रीकृष्णाने मोराची पिसं धारण केल्याच्या अनेक कथा आहेत. यातील एक कथा अशीही आहे की एकदा राधा कृष्णाच्या मुरलीच्या तालावर नाचत होत्या. तेवढ्यात काही मोरही तिथं आले आणि नाचू लागले. नाचादरम्यान मोराचे पंख खाली पडले. जे कृष्णाने राधाच्या प्रेमाचे प्रतीक मानून डोक्यावर ठेवलं. तेव्हापासून त्याच्या मुकुटात मोराची पिसे आहेत.

भगवान श्रीकृष्णाने मोराची पिसं धारण करण्यामागे आणखी एक कारण आहे. त्याचा मोठा भाऊ बलराम हा शेष नागाचा अवतार होता. मोर आणि साप हे एकमेकांचे शत्रू मानले जातात. कृष्ण मोरपीस घालून हा संदेश देतात की त्यांच्या मनात शत्रूसाठीही विशेष स्थान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन

SCROLL FOR NEXT