चिन्हं राजयोगाची Esakal
संस्कृती

Body Signs तुमच्या शरीरावर आहे का राजयोगाची चिन्ह? ही चिन्ह दर्शवतात राजयोगाची चिन्ह

कुंडली पाहून राजयोग आहे की नाही हे ज्योतिष शास्त्रातील तज्ज्ञ सांगू शकतात. त्याचसोबत तुमच्या शरीरावर असलेल्या काही खुणा किंवा काही जन्मखुण यामुळे तुमच्या कुंडलीत राजयोग आहे का हे ओळखणं शक्य आहे

Kirti Wadkar

हिंदू धर्मामध्ये कुंडली आणि कुंडलीतील ग्रहांना महत्वाचं स्थान आहे. शास्त्रानुसार ग्रहांचा तसंच ग्रह दिशेचा व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम होत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार Astrology प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली रास बदलत असतो. Astrology Marathi Tips Know the signs on your body to know about Rajyoga

ग्रहांच्या Planets या राशी बदलाला किंवा संक्रमणाला देखील ज्योतिषशास्त्रामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये Astrology and Hindu Religion महत्व आहे. राशीतील ग्रहांच्या बदलांमुळे व्यक्तीच्या आयुष्यात चढ-उतार, सुख-दु:ख येत असतात. ज्याप्रमाणे ग्रहांच्या बदलांचे वाईट परिणाम होवू शकतात त्याचप्रमाणे चांगले आणि शुभ योगदेखील येत असतात.

यापैकीच एक अत्यंत शुभ मानला जाणारा योग म्हणजेच राजयोग. खूप कमी लोकांच्या कुंडलीमध्ये राजयोग पाहायला मिळतो.

खरं तर राजयोग हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असाल. मात्र नेमकं राजयोग म्हणजे काय तसंच आपल्या कुंडलीत राजयोग आहे की नाही हे अनेकांना ठाऊक नसतं. कुंडली पाहून राजयोग आहे की नाही हे ज्योतिष शास्त्रातील तज्ज्ञ सांगू शकतात. त्याचसोबत तुमच्या शरीरावर असलेल्या काही खुणा किंवा काही जन्मखुण यामुळे तुमच्या कुंडलीत राजयोग आहे का हे ओळखणं शक्य आहे.

कसा तयार होतो राजयोग?

ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील नवव्या आणि दहाव्या घरात बसलेले ग्रह शुभ असतात तेव्हा कुंडलीत राजयोग तयार होतो. कुंडलीत राजयोग असल्यास व्यक्तीचं जीवन अत्यंत सुखावह होतं. एखाद्या राजाप्रमाणे त्याच्याकडे संपत्ती, आदर आणि सत्ता उपभोगण्याची संधी येते. राजयोग असलेल्या व्यक्तींना राजकारणात चांगलं यश मिळतं.

हे देखिल वाचा-

राजयोगाच्या खुणा

पायावरील खूण- समुद्र शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या पायावर किंवा तळव्यांवर चक्र किंवा कुंडलची खूण असेल तर अशी व्यक्ती नेता किंवा राजकारणी बनते. शिवाय अशा व्यक्तींना राजकारणात यश मिळून देशातील सत्तेच्या शिखर स्थानावर पोहचण्यास त्यांना यश मिळत.

हातावरील निशाण- ज्या व्यक्तीच्या हातावर मासा, वीणा, हस्ती, छत्र अशा प्रकारची कोणतीही खूण असेल तर हे राजयोगाचे संकेत आहेत. अशा व्यक्तींना सुख-समृद्धीमध्ये आयुष्य घालवता येते. शिवाय समाजातही मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते.

हाता पायांवरील तीळ- शरीरावरील तीळ देखील राजयोगाचे संकेत देतात. जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर आणि तळव्यांवर तीळ असेल तर हा राजयोगाचं संकेत मानावा. ज्या व्यक्तीच्या हातावर मधोमध तीळ असतो अशी व्यक्ती धनवान आणि भाग्यशाली असतात. तर पायांवर तीळ असलेल्या व्यक्तीला एखाद्या राजाप्रमाणे मान-सन्मान मिळणार असं समजावं.

अशा प्रकारे शरीरावरील या खुणा किंवा तीळांमुळे तुम्हाला तुमच्या जीवनात राजयोग आहे की नाही हे लक्षात येऊ शकतं.

टीप - वरील लेख ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या गृहितकांवर आधारित आहे. यात अंधश्रद्धेला पाठिंबा देण्याचा कुठलाही हेतू नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकतर्फी निकाल की धक्कादायक उलथापालथ? काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेचा फायदा कुणाला? अमरावती विधानपरिषदेचा आज फैसला

Industrial Pollution : कुरकुंभ एमआयडीसीतील ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’वर प्रदूषण प्रकरणी कडक कारवाई; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्पादन तत्काळ बंद करण्याचे आदेश

उत्तम गुंतवणूक : निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांक : गुंतवणुकीची आकर्षक संधी

Pune Traffic: बाबा भिडे पूल २२ जून ते ६ जुलैपर्यंत पूर्ण बंद; डेक्कन मेट्रो पादचारी केबल पुलाच्या कामासाठी वाहतूक बदल, पर्यायी मार्ग जाहीर

Pesarattu Recipe: प्रोटीनने भरपूर, चवीला जबरदस्त! आंध्र प्रदेशचा लोकप्रिय नाश्ता पेसरट्टू; एकदा खाल तर पुन्हा पुन्हा ट्राय कराल

SCROLL FOR NEXT