Bail Pola 2022
Bail Pola 2022 Esakal
संस्कृती

Bail Pola 2022: बैलपोळा सण साजरी करण्याची पारंपरिक पद्धत कशी आहे?

दिपाली सुसर

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण श्रावण अमावस्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी बैलपोळा 26 ऑगस्ट रोजी (Pola 2022) आहे. या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो. या दिवशी बैलांचे कौतुक केलं जातं. या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते. बैलांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते. या दिवशी बैलांचे खांते तुपाने किंवा हळदीने शेकले जातात. बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. त्यांना सजवून त्यांची मिरवणूक देखील काढली जाते.

बैल पोळ्याचे महत्त्व

बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात. शेती मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे म्हणून एक दिवस ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करुन त्यांचे कौतुक करतात. या दिवशी बैलाची पूजा केली जाते. त्याची मिरवणूक काढली जाते. शहरी भागात महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य दाखवलं जातं. बैलांसाठी खास ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात.

पोळा हा सण विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातही हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात दर्श अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात पोळा सण साजरा केला जातो.पोळा सणाचा नैवेद्य

पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवतात.

बैल पोळा पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात धर्तीवर अवतरले होते तेव्हापासून कृष्णाचे मामा कंसने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस श्रावण अमावास्येचा होता. या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो.

बैलांचा साजशृंगार

पोळा सणाचा शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह असतो. आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात. बैल सजवितात व मिरवणुकीत भाग घेतात. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' म्हणजेच पोळा सणाची गीते म्हणायची पद्धत आहे. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो. करोना संकटाचा विचार करता मिरवणुका काढता येणार नाहीत, तरी शेतकरी वर्ग घरच्या घरी हा सण साजरा करतील, यात शंका नाही. परंतु जर इतर सर्व सुविधा सुरू केल्या गेल्या आहे आणि भाविकांचे श्रद्धा स्थान मंदिरे बंद आहेत असे सांगणाऱ्या, यावर आक्रमक झालेल्या श्रद्धाळूंनी मनावर घेतलं तर हा सण आणि येणारे पुढील सर्वच सण परंपरेनुसार साजरे होतील अशी शक्यता आहे.


देशभरात कसा साजरा होतो बैलपोळा?

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बैलपोळा सण साजरा केला जात असून मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये देखील शेतकरी वर्ग हा सण साजरा करतो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमांध्र भागात देखील पोळा साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी ज्यांच्याकडे बैल नाहीत ते मातीच्या बैलांची पूजा करतात. तेलंगणाच्या उत्तरेकडे भागात बैलपोळा सणाला पुलाला अमावस्या म्हटले जाते. तर काही ठिकाणी बेंदूर असे देखील म्हणतात. तर दक्षिणेत या सणाला पोंगल आणि उत्तर व पश्चिम भारतात गोधन असे म्हटले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT